RRB Paramedical Bharti 2024 : मित्रांनो, भारतीय रेल्वेमध्ये 1376 पदे भरण्यासाठी RRB Paramedical Bharti 2024 ही भरती नुकतीच सुरू झाली आहे. या मेगा भरतीसाठी अर्ज भरण्याची अखेर तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे. RRB पॅरामेडिकल भरती मार्फत युवांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. ही संधी अजिबात सोडू नका..! भारतीय शासन, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती मंडळ (RRB) आर आर बी पॅरामेडिकल रिक्रुटमेंट 2024 ( आर आर बी पॅरामेडिकल भरती 2024 / रेल्वे भरती 2024 ). आहारतज्ञ, नर्सिंग अधीक्षक, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरेपी, डायलोसिस्ट आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक ग्रेड 3, आरोग्य शाळा अधीक्षक, फिजिओथेरपिस्ट ग्रेड 2, व्यावसायिक थेरपीस्ट, कॅथ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट ( प्रवेश श्रेणी ), रेडिओग्राफर एक्स-रे तंत्रज्ञ, स्पीच थेरपिस्ट, कार्डियाक टेक्निशियन, ऑप्टोमेट्रीस्ट,ECG सहाय्यक, लॅबोरेटरी तंत्रज्ञ इत्यादी. फिल्ड वर्कर पदे आहेत.
RRB Paramedical Bharti 2024 भारतीय रेल्वे भरती 2024 ची अधिसूचना रेल्वे भरती बोर्डाने दिली होती. 8 ऑगस्ट 2024 रोजी वेगवेगळ्या पॅरामेडिकल जागांच्या भरतीसाठी जारी केली होती. RRB पॅरामेडिकल भरती 2024 साठी अनेक पदांकरिता पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. RRB ॲप्लिकेशन विंडो 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2024 पर्यंत खुली असेल ज्या उमेदवारांची इच्छा असेल, त्याने आर आर बी पॅरामेडिकल रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकता. जो उमेदवार एकापेक्षा जास्त वेळा अर्ज करेल तो पात्र नाही असे गृहीत धरले जाईल. व भविष्यात होणाऱ्या रेल्वे भरतीस प्रतिबंध घालण्यात येईल. अखेरच्या वेळी तांत्रिक अडचणी न येण्यासाठी दिलेल्या मुदतीत अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.
मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत, या मोहिमेत आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.
सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रीणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.
RRB Paramedical Bharti 2024 चे ठळक मुद्दे :
परीक्षेचे आयोजन कोण करणार | भारतीय रेल्वे भरती बोर्ड |
पोस्ट | RRB पॅरामेडिकल पोस्ट |
किती जागांकरिता | 1376 |
अर्ज करण्याची तारीख- | 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन पद्धतीने |
परीक्षा कशा प्रकारे होईल | संगणकाद्वारे चाचणी |
RRB पॅरामेडिकल भरतीच्या परीक्षेची तारीख लवकरच घोषित केली जाईल. RRB पॅरामेडिकल भरतीस इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी पुढील महत्त्वाच्या तारखा जाणून घेणे गरजेचे आहे.
RRB Paramedical Bharti 2024 च्या महत्त्वपूर्ण तारखा :
भरती प्रकाशनाची तारीख | 8 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची तारीख | 17 ऑगस्ट 2024 पासून सुरू |
अर्जाची अखेर तारीख | 16 सप्टेंबर 2024 पर्यंत |
अर्जाच्या दुरुस्तीची तारीख | 17 ते 26 सप्टेंबर 2024 |
परीक्षेची तारीख | घोषित झालेली नाही |
उत्तर की | घोषित झालेली नाही |
प्रवेश पत्र सोडण्याची तारीख | घोषित झालेली नाही |
निकाल/ अंतिम तारीख | घोषित झालेली नाही |
रेल्वे भरती मंत्रालयाने RRB पॅरामेडिकल रिक्रुटमेंट 2024 मार्फत RRB पॅरामेडिकलच्या अनेक पदांकरिता घोषणा केली आहे. RRB पॅरामेडिकल भरतीच्या जागांची व पोस्टची माहिती आपण पुढील सारणी द्वारे जाणून घेऊ!
RRB Paramedical Bharti 2024 साठीचे विविध पदे :
पदाचे नाव | पदाची संख्या |
आहारतज्ञ | 05 |
नर्सिंग अधीक्षक | 713 |
ऑडिओ लॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट | 04 |
क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ | 07 |
दंत आरोग्य तज्ञ | 03 |
डायलिसिस तंत्रज्ञ | 20 |
आरोग्य व मलेरिया निरीक्षक ग्रेड 3 | 126 |
प्रयोगशाळा अधीक्षक ग्रेड 3 | 27 |
परफ्यूजनिस्ट | 02 |
फिजिओथेरपिस्ट ग्रेड 2 | 20 |
व्यावसायिक थेरपीस्ट | 02 |
कॅथ प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 02 |
फार्मासिस्ट ( प्रवेश श्रेणी | 246 |
रेडिओ ग्राफर एक्स-रे | 64 |
स्पीच थेरपिस्ट | 01 |
कार्डियाक टेक्निशियन | 04 |
ऑप्टोमेट्रीस्ट | 04 |
ईसीजी (ECG)तंत्रज्ञ | 13 |
प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड 2 | 94 |
फिल्ड वर्कर | 19 |
एकूण | 1376 |
RRB Paramedical Bharti 2024 साठी ची वय मर्यादा :
- पद क्रमांक1,4,5,7,8,10,11,12,15 ते19:18 ते 36 वर्षे
- पद क्रमांक 2: 20 ते 43 वर्ष
- पद क्रमांक 3: 21 ते 30 वर्ष
- पद क्रमांक 6: 20 ते 36 वर्ष
- पद क्रमांक 9: 21 ते 43 वर्ष
- पद क्रमांक 13: 20ते 38 वर्ष
- पद क्रमांक14 : 19 ते 36 वर्ष
- पद क्रमांक 20 : 18 ते 33 वर्ष
RRB पॅरामेडिकल भरती 2024 ची अर्ज प्रक्रिया 17 ऑगस्ट 2024 ला सुरू होणार आहे. इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरताना या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
RRB Paramedical Bharti 2024 अर्ज प्रक्रिया :
RRB Paramedical Bharti 2024 / रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या .RRB पॅरामेडिकल भरती 2024 चे पर्याय शोधा आणि आपल्या आवडीने निवडा, नंतर ऑनलाईन अर्ज करा या नावाच्या बटनाला क्लिक करा. मग आपल्याबद्दलची आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेची सर्व माहिती तेथे योग्य त्या जागी भरा आपला पासपोर्ट साईज फोटो, सही व इतर कागदपत्रे अचूक पद्धतीने अपलोड करा आणि अर्जाची ऑनलाईन पद्धतीने फी भरा.
RRB Paramedical Bharti 2024 ऑनलाइन अर्ज करताना लागणारी शुल्क :
श्रेणी | अर्जाची फी |
SC/SR/ माजी सैनिक /PwBD, महिला / ट्रान्सजेंडर/EBC | 250/- रुपये |
आरक्षण नसलेला वर्ग | 500/- रुपये |
RRB Paramedical Bharti 2024 उमेदवारांची निवड प्रक्रिया :
RRB Paramedical Bharti 2024 साठी अर्जकर्ता उमेदवाराची निवड ही दोन ते तीन टप्प्यात होणार आहे, ती अशी की उमेदवाराला कोणती कला अवगत आहे का त्याची शैक्षणिक पात्रता किती आहे याची पडताळणी करून त्याची निवड केली जाईल.
1) लेखी परीक्षा
2) कागदपत्रांची तपासणी
3) शारीरिक चाचणी
4)मेरिट लिस्ट
RRB Paramedical Bharti 2024 Important Links :
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
प्रिय मित्रांनो,RRB पॅरामेडिकल भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना RRB पॅरामेडिकल भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाता नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!