NPCIL Recruitment 2024|न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 279 जागांची भरती ; पहा संपूर्ण माहिती !

ही माहिती इतरांना शेअर करा.

NPCIL Recruitment 2024 : नमस्कार, न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 ( Nuclear Power Corporation of India Limited Bharti 2024/NPCIL Recruitment 2024 ) यांच्या अंतर्गत 279 पदांची मेगा भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. असेच म्हणावे लागेल. कारण ही भरती आपल्या देशातील न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची असून, विविध पदांसाठी असणार आहे.

NPCIL Recruitment 2024 / न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ही आपल्या देशातील अणुऊर्जा संस्थांपैकी एक महत्त्वाची अणुऊर्जा संस्था आहे. तिच्या विविध प्रकल्पांसाठी तज्ञ, अभियंते आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती करत असते. त्याचप्रमाणे यावर्षी देखील ऑपरेटर आणि मेंटेनर पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीस पात्र आणि इच्छुक उमेदवारांचे शिक्षण कमीत कमी 10 वी, 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. चांगल्या पगाराच्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. या भरतीस उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2024 असणार आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ न लावता लवकरात लवकर अर्ज सादर करावा.

मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत, या मोहिमेत आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रीणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका! आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपता जॉईन करा.

NPCIL Recruitment 2024 Important Matters / Important Points :

संपूर्ण जागा – न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 279 पदांची मेगा भरती असणार आहे.

पदांचे नाव – ही भरती न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये ऑपरेटर आणि मेंटेनर पदांसाठी असून विविध जागांसाठी असणार आहे.

विभाग – या सदर भरतीचा विभाग न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असणार आहे.

भरती श्रेणी – सदर भरती केंद्र श्रेणी अंतर्गत असणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदर भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी पास असणे गरजेचे असून पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. त्याची संपूर्ण माहिती आपण पुढे लेखात दिलेली आहे.

अर्ज पद्धती – न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 साठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो. अधिक माहिती साठी अंतर्गत पीडीएफ ( PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.

अर्ज शुल्क – न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरतीस अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडून 100/- रुपये प्रति अर्ज शुल्क आकारले जाईल. आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

मासिक वेतन न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती दरम्यान नियुक्त उमेदवाराला मासिक वेतन पदानुसार ठरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.

अर्जाची तारीख – सदर भरतीस पात्र उमेदवाराला 22 ऑगस्ट 2024 ते 11 सप्टेंबर 2024 या दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.

वयाची अट – न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 24 वर्ष यादरम्यान असले पाहिजे. पैसा अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.

नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला राजस्थान येथील रावतभाटा साईट (NPCIL) येथे नोकरी असणार आहे.

NPCIL Recruitment 2024 Education Qualification :

NPCIL Recruitment 2024 / न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठातून कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 50% पेक्षा जास्त मार्कांनी 12 वी उत्तीर्ण ( भौतिकशास्त्र, रासायनिक शास्त्र, आणि गणित ), आयटीआय ( ITI इलेक्ट्रिशियन, फिटर, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, मशिनिस्ट, टर्नर, वेल्डर ) पूर्ण असले पाहिजे, शैक्षणिक पात्रतेदरम्यान उमेदवाराचे शिक्षण चालूच असेल तर, तो उमेदवार भरतीस अपात्र ठरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.

NPCIL Recruitment 2024 Selection Process :

NPCIL Recruitment 2024 या भरतीस अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे, कौशल्य चाचणी द्वारे, शारीरिक मानक चाचणी / कागदपत्रे तपासणी द्वारे केली जाणार आहे. लेखी परीक्षा ही दोन टप्प्यांमध्ये घेतली जाईल. पहिल्या टप्प्यामध्ये सामान्य ज्ञान आणि तांत्रिक ज्ञानाचे प्रश्न विचारले जातील, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रगट परीक्षेचा समावेश केला जाईल. शारीरिक मानक चाचणी किंवा कागदपत्रे तपासणी मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यामध्ये सहभागीकेले जाईल. कौशल्य चाचणी ही पदावर अवलंबून असेल. त्यासाठी उमेदवाराची तयारी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ ( PDF) जाहिरातीचा आढावा घ्या. लिंक आपण लेखात दिलेली आहे.

हेही वाचा: MUCBF Recruitment 2024: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत “कनिष्ठ लिपिक” पदांसाठी भरती! येथून करा अर्ज

NPCIL Recruitment 2024 Important :

NPCIL Recruitment 2024 / या भरतीस पात्र व इच्छुक उमेदवाराला 22 ऑगस्ट 2024 ते 11 सप्टेंबर 2024 या दरम्यान ऑनलाईन अर्ज करणे महत्त्वाचे आहे. ही भरती 279 जागांसाठी असून त्यामध्ये कॅटेगरी II- स्टायपेंडरी ट्रेनि(ST/TN) ऑपरेटर पदाच्या 153 जागा असतील आणि कॅटेगरी II- स्टायपेंडरी ट्रेनि(ST/TN) मेंटेनर पदाच्या 126 जागा असतील. महत्त्वाचे म्हणजे या भरतीसाठी महिलांना देखील अर्ज सादर करता येणार आहे. त्याही या भरतीत सहभागी होऊ शकतात.

NPCIL Recruitment 2024 Important Documents :

आवश्यक कागदपत्रे – तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे ती पुढील प्रमाणे…

  • आधार कार्ड/ मतदान कार्ड/ पासपोर्ट/ उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवाशी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला/ TC
  • शैक्षणिक कागदपत्रे / प्रमाणपत्रे
  • जातीचा दाखला/ प्रमाणपत्र
  • उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
  • डोमासाईल प्रमाणपत्र
NPCIL Recruitment 2024 Apply Process :

1) या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.

2) न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024 / Nuclear Power Corporation of India Bharti 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या. लिंक आपण लेखात दिलेली आहे.

3) भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाइन पद्धतीने सादर करा.

4) अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सोडा किंवा स्कॅन करा.

5) सदर भरतीस सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही

6) 11 सप्टेंबर 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. तो असमर्थ ठरविण्यात येईल.

7) न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते.

8) संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा, आणि भरतीचा पुरेपूर लाभ घ्या.

NPCIL Recruitment 2024 Special Notification :

NPCIL Recruitment 2024 / न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 साठी उमेदवार मोबाईलद्वारे अर्ज करण्याचा प्रयन करत असतात. मोबाईलवर अर्ज करताना वेबसाईट ओपन झाली नाही तर, घाबरायचे नाही शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करा. किंवा मोबाईल मधील लैंडस्केप मोड निवडा. अर्ज सादर करताना वैयक्तिक ई-मेल आयडी आणि चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे. तुम्हाला पुढील संपूर्ण माहितीची सूचना इमेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार आहे.

NPCIL Recruitment 2024 Important Links :
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्ज
येथे क्लिक करा
💻 सविस्तर माहिती
येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट
येथे क्लिक करा

प्रिय मित्रांनो, न्यूक्लिअर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरीत लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाता नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now