MUCBF Vacancy 2024 : नमस्कार, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024 ( Maharashtra Urban Co-Operative Federation Limited Bharti 2024/MUCBF Vacancy 2024) यांच्या अंतर्गत एकूण 12 पदांच्या रिक्त भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. कारण ही भरती आपल्या महाराष्ट्र राज्यातील एका प्रतिष्ठित बँकेची असून कनिष्ठ लेखनिक ( junior clerk) या पदासाठी असणार आहे.
MUCBF Vacancy 2024 / महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड ही महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक क्षेत्रात एक महत्त्वाची बँक मानली जाते.महाराष्ट्रातील युवकांना सरकारी नोकरीचा उत्तम पर्याय प्रदान करते. नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. जर तुम्हालाही या भरतीस अर्ज करण्याची इच्छा असेल तर, तुमची शिक्षण पात्रता आवश्यक असणे गरजेचे आहे. या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2024 असणार आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ न लावता लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मोहिमेत आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.
सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका! आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.
MUCBF Vacancy 2024 Important Matters / Important Points :
संपूर्ण जागा – महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती 12 पदांची रिक्त भरती असणार आहे.
पदांचे नाव – ही भरती महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँकेत कनिष्ठ लिपिक ( junior clerk ) या पदासाठी असणार आहे.
विभाग – या सदर भरतीचा विभाग महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक असणार आहे.
भरती श्रेणी – सदर भरती राज्य श्रेणी अंतर्गत असणार आहे.
शैक्षणिक पात्रता – सदर भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठातून पदवी, MSCIT पूर्ण प्रमाणपत्र केव्हा समजतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे.
अर्ज पद्धती – महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती 2024 साठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ ( PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.
अर्ज शुल्क – महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून 1180/- रुपये प्रति अर्ज शुल्क आकारले जाईल.
मासिक वेतन – महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड भरती दरम्यान नियुक्त उमेदवाराला 57,000/- हजार रुपये ते 1,77,000/- हजार रुपये एवढे मासिक वेतन दिले जाईल.
अर्जाची तारीख – सदर भरती पात्र उमेदवाराला 7 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंतच अर्ज सादर करता येणार आहे. नंतर केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
वयाची अट – महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 वर्ष ते 35 वर्ष या दरम्यान असले पाहिजे. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँकेत जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धुळे या ठिकाणच्या शाखांमध्ये नोकरी असणार आहे.
MUCBF Vacancy 2024 Education Qualification :
MUCBF Vacancy 2024 / महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठातून कमीत कमी 12 वी पास असणे गरजेचे आहे.विज्ञान, वाणिज्य,कला, विधी, किंवा कुठल्याही शाखेचा पदवीधर असून 50% पेक्षा जास्त मार्कांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र, मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे. उमेदवाराची MSCIT उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, उमेदवाराचे इंग्रजी व मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवार आकडे कॉम्प्युटर मधील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्डप्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस, सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट गोष्टींचे चांगले ज्ञान असले पाहिजे. उमेदवाराचे शिक्षण पात्रतेदरम्यान शिक्षण चालूच असेल तर, उमेदवार भरती अपात्र ठरविण्यात येईल. असा उमेदवार भरतीमध्ये सहभागी होऊ शकत नाही.
MUCBF Vacancy 2024 Important Documents :
आवश्यक कागदपत्रे – तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज सादर करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे ती पुढील प्रमाणे…
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला / TC
- शैक्षणिक कागदपत्रे / प्रमाणपत्रे
- जातीचा दाखला / प्रमाणपत्र
- उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT / आवश्यकतेनुसार इतर प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
MUCBF Vacancy 2024 Selection Process :
MUCBF Vacancy 2024 या भरतीस अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड ऑनलाइन पद्धतीने बहुपर्यायी चाचणी किंवा एमसीक्यू (MCQ) परीक्षेद्वारे केली जाऊ शकते. ऑनलाइन परीक्षेमध्ये मिळवलेल्या गुणांच्या साह्याने उमेदवारांची निवड केली जाऊ शकते. या ऑनलाइन परीक्षेत 100 मिनिटात 100 मार्कासाठी 100 प्रश्न विचारले जातील, ती मराठी भाषा, इंग्रजी भाषा, जनरल नॉलेज/ सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता या विषयांच्या आधारे असेल. त्यासाठी उमेदवाराची तयारी असणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
MUCBF Vacancy 2024 Apply Process :
1) महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती 2024 या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
2) महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड भरती 2024 Maharashtra Urban Co-Operative Bank Federation Limited Bharti 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
3) भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करा.
4) अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा किंवा स्कॅन करा.
5) सदर भरतीस सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
6) 7 सप्टेंबर 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. तो समर्थ ठरविण्यात येईल.
7) MUCBF Vacancy 2024 / महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती भरती 2024 दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये, अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते. याची दखल घ्यावी.
8) संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा आणि भरतीचा पुरेपूर लाभ घ्या.
MUCBF Vacancy 2024 Special Notification :
MUCBF Vacancy 2024 / महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती 2024 साठी उमेदवार मोबाईल द्वारे अर्ज सादर करण्याचा प्रयत्न करत असतात. मोबाईल द्वारे अर्ज करताना वेबसाईट ओपन झाली नाही तर, घाबरायचे नाही, शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करा. किंवा मोबाईल मधील लँडस्केप मोड निवडा. अज सादर करताना वैयक्तिक ई-मेल आयडी आणि चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे. तुम्हाला पुढील संपूर्ण माहितीची सूचना ई-मेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार आहे.
MUCBF Vacancy 2024 Important Links :
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
प्रिय मित्रांनो, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरीत लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या ही नम्र विनंती…!