MSRTC Mumbai Bharti 2024 : नमस्कार, एसटी महामंडळ मुंबई भरती 2024 (MSRTC Mumbai Bharti 2024/ Maharashtra State Road Transport Corporation Mumbai Bharti 2024) यांच्या अंतर्गत अनेक रिक्त पदांच्या भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. राज्यातल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. कारण ही भरती आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी मायानगरी मुंबई मध्ये एसटी महामंडळात चालक पदासाठी करण्यात येणार आहे.
MSRTC Mumbai Bharti 2024 / एसटी महामंडळ मुंबई दरवर्षी विविध पदांसाठी भरती करत असते. त्याचप्रमाणे यावर्षी देखील त्यांनी सदर भरती करण्याचे योजले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्यातल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीचा एक उत्तम पर्याय असू शकतो. अशाच होतकरू आणि गरजूवंत तरुणांसाठी ही एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. जर तुम्हालाही या भरतीचा अर्ज करण्याची इच्छा असेल तर, तुमची शिक्षण पात्रता आवश्यक असणे गरजेचे आहे. एसटी महामंडळ मुंबई भरती 2024 साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 6 सप्टेंबर 2024 असणार आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ न लावता लवकरात लवकर सादर करावा.
मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मोहिमेत आवश्यक असणारी शिक्षणपात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण, अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊया.
सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका! आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.
MSRTC Mumbai Bharti 2024 Important Matters / Important Points :
संपूर्ण जागा – एसटी महामंडळ मुंबई भरती 2024 ही अनेक पदांसाठी भरती असून पद संख्या निर्दिष्ट नाही.
पदांचे नाव – ही भरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत मायानगरी मुंबई येथे चालक पदासाठी केली जाणार आहे.
विभाग – या सदर भरतीचा विभाग एसटी महामंडळ,मुंबई असणार आहे.
भरती श्रेणी – सदर भरती राज्य श्रेणी अंतर्गत असणार आहे.
शैक्षणिक पात्रता – सदर भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे. गरजेचे असून पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. त्याची संपूर्ण माहिती आपण पुढे लेखात दिलेली आहे.
अर्ज पद्धती – एसटी महामंडळ मुंबई भरती 2024 साठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ ( PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.
अर्ज शुल्क – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ / एसटी महामंडळ, मुंबई भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
मासिक वेतन – एसटी महामंडळ, मुंबई भरती दरम्यान नियुक्त उमेदवाराला मासिक वेतन पदानुसार ठरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
अर्जाची तारीख – सदर भरतीस पात्र उमेदवाराला 2 सप्टेंबर 2024 ते 6 सप्टेंबर 2024 या दरम्यान ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
वयाची अट – एसटी महामंडळ, मुंबई भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्षे ते 40 वर्ष या दरम्यान असले पाहिजे. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला एसटी महामंडळ, मुंबई येथे नोकरी असणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – वाहतूक खाते, मध्यवर्ती कार्यालय, वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई-400008 या पत्त्यावर उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
MSRTC Mumbai Bharti 2024 Education Qualification :
MSRTC Mumbai Bharti 2024 / एसटी महामंडळ, मुंबई भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठातून कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अवजड वाहन चालवण्याचा परवाना घेऊन कमीत कमी 1 वर्ष पूर्ण झालेले असले पाहिजे आणि अवजड वाहन किंवा प्रवासी वाहतुकीचा अनुभव असणे आवश्यक आहे. अवजार वाहन चालविण्याचा वैद्य परवाना व पी एस व्ही बॅच असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे शैक्षणिक पात्रतेदरम्यान शिक्षण चालूच असेल तर, तो उमेदवार भरतीस अपात्र ठेवण्यात येईल. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ ( PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.
MSRTC Mumbai Bharti 2024 Selection Process :
MSRTC Mumbai Bharti 2024 या भरतीस अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखत करून घेतली जाऊ शकते, लेखी परीक्षेद्वारे केली जाऊ शकते, ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाऊ शकते. किंवा अवजड वाहन चालवणे चाचणी घेतली जाऊ शकते निवडकर्ते अधिकारी त्यांच्या विवेक बुद्धीनुसार निवड प्रक्रिया करू शकतात. त्यासाठी उमेदवाराची तयारी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.
MSRTC Mumbai Bharti 2024 Important Documents :
आवश्यक कागदपत्रे – तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज सादर करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. ती पुढील प्रमाणे…
- आधार कार्ड / मतदान कार्ड/ पासपोर्ट/ उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवाशी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला / TC
- शैक्षणिक कागदपत्रे / प्रमाणपत्रे
- जातीचा दाखला/ प्रमाणपत्र
- उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
- डोमासाईल प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
MSRTC Mumbai Bharti 2024 Apply Process :
- MSRTC Mumbai Bharti 2024 / या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
- एसटी महामंडळ,मुंबई भरती 2024 / Maharashtra State Road Transport Corporation,Mumbai Bharti 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या. लिंक आपण लेखात दिलेली आहे.
- भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करा.
- MSRTC Mumbai Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे / प्रत जोडा.
- सदर भरतीस सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
- 6 सप्टेंबर 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. तो समर्थ ठरविण्यात येईल.
- MSRTC Mumbai Bharti 2024 / एसटी महामंडळ, मुंबई भरती दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये.अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते.
- संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा आणि भरतीचा पुरेपूर लाभ घ्या.
MSRTC Mumbai Bharti 2024 Important Links :
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
प्रिय मित्रांनो, एसटी महामंडळ,मुंबई भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना एसटी महामंडळ,मुंबई भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाता नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!