Kokan Railway Vacancy 2024|10 वी उत्तीर्ण असाल तर, कोकण रेल्वे मध्ये तुमच्यासाठी नोकरीची मोठी संधी आहे!

ही माहिती इतरांना शेअर करा.

Kokan Railway Vacancy 2024 : नमस्कार, कोकण रेल्वे भरती 2024 ( Kokan Railway Vecancy 2024 / Kokan Railway Recruitment 2024) यांच्या अंतर्गत तब्बल 190 पदांच्या मेगा भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. असेच म्हणावे लागेल.

ही भरती आपल्या देशातील कोकण रेल्वेची असून, स्टेशन मास्टर, वरिष्ठ विभाग अभियंता सिव्हिल इलेक्ट्रिकल, कमर्शियल पर्यवेक्षक, असिस्टंट लोको पायलट, पॉईंट्स में, ट्रॅक मेंटेनर -IV, गुड्स ट्रेन मॅनेजर, टेक्नीशियन -III, मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल ESPN -III ( S&T) अशा विविध पदांसाठी असणार आहे. नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो. किंवा कोकण रेल्वे भरती 2024 ही एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. जर तुम्हालाही या भरतीचा अर्ज करण्याची इच्छा असेल तर, तुमची शिक्षण पात्रता आवश्यक असणे गरजेचे आहे. कोकण रेल्वे भरती 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर 2024 असणार आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ न लावता लवकरात लवकर अर्ज सादर करावा.

Konkan Railway Vacancy 2024
Konkan Railway Vacancy 2024

मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मोहिमेत आवश्यक असणारी शिक्षणपात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण, अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका! आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.

Kokar Railway Vacancy 2024 महत्त्वाच्या बाबी / महत्त्वाचे मुद्दे :

संपूर्ण जागाकोकण रेल्वे भरती 190 पदांची रिक्त भरती असणार आहे.
पदाचे नावही भरती कोकण रेल्वे मध्ये विविध पदांसाठी असणार आहे.
विभागया सदर भरतीच्या विभाग कोकण रेल्वे असणार आहे.
भरती श्रेणीसदर भरती महाराष्ट्र राज्य श्रेणी अंतर्गत असणार आहे.

शैक्षणिक पात्रता सदर भरती अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शिक्षण पात्रता कमीत कमी 10 वी पास असणे गरजेचे असून पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. त्याची संपूर्ण माहिती आपण पुढे लेखात दिलेली आहे.

अर्ज पद्धती – कोकण रेल्वे भरती 2024 साठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ ( PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.

अर्ज शुल्क – कोकण रेल्वे भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून SC, ST व इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 135/- रुपये तसेच OPEN, OBC खुल्या प्रवर्गासाठी 885/- रुपये प्रति अर्ज शुल्क आकारले जाईल.

मासिक वेतन – कोकण रेल्वे भरती दरम्यान नियुक्त उमेदवाराला 18000/- हजार रुपये ते 45000/- हजार रुपये एवढे मासिक वेतन पदानुसार देण्यात येणार आहे.

अर्जाची तारीख – सदर भरतीस पात्र उमेदवाराला 16 सप्टेंबर 2024 ते 6 ऑक्टोबर 2024 या दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.

वयाची अट – कोकण रेल्वे भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 36 वर्ष यादरम्यान असले पाहिजे. SC, ST व इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 वर्षांची सूट असेल. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला कोकण रेल्वे मध्ये नोकरी असणार आहे.

Kokan Railway Vacancy 2024 शैक्षणिक पात्रता व निकष :

Konkan Railway Vacancy 2024 / कोकण रेल्वे भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठातून कमीत कमी 10 वी पास असणे गरजेचे असून विविध पदानुसार शैक्षणिक पात्रतेची गरज भासेल. ती पुढील प्रमाणे…

सीनियर सेक्शन इंजिनियर / इलेक्ट्रिकल : मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनीयरिंग किंवाAICTE. शासनमान्य विद्यापीठ, संस्थेमार्फत मेकॅनिक, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंगच्या मूलभूत शाखेच्या कोणत्याही उपशाखांचे संयोजन.

टेकनिशियन -III/ इलेक्ट्रिकल : दहावी पास आणि आयटीआय (ITI)NCVT/SCVT च्या शासनमान्य संस्थांकडून इलेक्ट्रिशियन, वायरमन, मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक किंवा 10वी पास.

असिस्टंट लोको पायलट : 10 वी पास आणि NCVT/SCVT च्या शासनमान्य संस्थेकडून आयटीआय ( ITI) आर्मेचर व कॉइल वाईंडर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, हिट इंजिन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट, मेकॅनिक डिझेल, वाहन मेकॅनिक, मिल राईट मेंटेनन्स मेकॅनिक, टीव्ही आणि रेडिओ मेकॅनिक, रेफ्रिज रेशन आणि वातानुकूलन मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, टर्नर, वायरमेन.

सीनियर सेक्शन इंजिनियर : सिविल इंजीनियरिंग मध्ये चार वर्षांची पदवी / AICTE शासनमान्य विद्यापीठ / संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मूलभूत शाखांच्या कोणत्याही उपशाखांचे संयोजन.

ट्रॅक मेंटेनर :शासनमान्य विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण.

टेक्निशियन -III :10 वी पास व NCVT/ SCVT शासनमान्य संस्था कडून आयटीआय ( ITI) फिटर/ मेकॅनिक डिझेल/ मेकॅनिक ऑटोमोबाईल / वाहन मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / वेल्डर / पेंटर किंवा 10 वी पास

स्टेशन मास्टर :कुठल्याही शासनमान्य विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर.

गुड्स ट्रेन मॅनेजर : कुठल्याही शासनमान्य विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर.

पॉईंट्समन : शासनमान्य बोर्डाकडून 10 वी उत्तीर्ण

इ एस टी एम ( ESPN -III):10वी पास आणि ECVT/SCVT शासनमान्य संस्थेकडून आयटीआय ( ITI) इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमेन.

कमर्शियल सुपरवायझर : कुठल्याही शासनमान्य विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर

हेही वाचा : Raigad DCC Bank Recruitment 2024: रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये 200 क्लर्क पदांची भरती! पहा पात्रता व अर्ज

Kokan Railway Vacancy 2024 पदांविषयी माहिती :

पदाचे नावजागा
सीनियर सिविल इंजिनियर सेक्शन05
सीनियर इलेक्ट्रिकल इंजिनियर सेक्शन 05
मास्टर सेक्शन10
कमर्शियल सुपरवायजर05
गुड्स ट्रेन मॅनेजर 05
मेकॅनिकल टेक्निशियन -III 20
इलेक्ट्रिकल टेक्निशियन -III 15
ESTM – III(S&T)15
असिस्टंट लोको पायलट15
पॉईंट्स मेन 60
ट्रॅक मेंटेनर – IV35
एकूण 190
Kokan Railway Vacancy 2024 निवड प्रक्रिया :

Konkan Railway Vacancy 2024 / या भरतीस अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड ऑनलाइन पद्धतीने बहुपर्यायी चाचणी किंवा एमसीक्यू ( MCQ) परीक्षेद्वारे केली जाऊ शकते. अर्ज केलेल्या उमेदवारांची मुलाखात करून व कागदपत्रांची तपासणी करून निवड केली जाईल. संगणकाद्वारे बहुपर्यायी ऑनलाइन परीक्षा करताना मराठी भाषा, इंग्रजी भाषा, जनरल नॉलेज/ सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता या विषयांचा आधारे प्रश्न विचारले जातील. त्यासाठी उमेदवाराची तयारी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी लेखात दिलेल्या अधिकृत पीडीएफ जाहिरातीच्या लिंक वर क्लिक करा.

Kokan Railway Vacancy 2024 अर्ज प्रक्रिया :

1) कोकण रेल्वे भरती 2024 या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.

2) कोकण रेल्वे भरती 2024 / Konkan Railway Vacancy 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ ( PDF) किंवा अधिकृत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.

3) भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.

4) सदर भरतीस सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.

5) अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.

6) उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा द्वारे केली जाणार असून उमेदवारांनी अर्ज भरताना परीक्षा शुल्क ही भरायची आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या.

7) 6 ऑक्टोबर 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

8) कोकण रेल्वे भरती 2024 दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये, अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते. याची दखल घ्यावी.

9) संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा, आणि भरतीचा लाभ घ्या.

Konkan Railway Vacancy 2024 विशेष सूचना :

Kokan Railway Vacancy 2024 / कोकण रेल्वे भरती 2024 साठी उमेदवार मोबाईल द्वारे अर्ज करण्याचा प्रयत्न करत असतात. मोबाईलवर अर्ज करताना वेबसाईट ओपन झाली नाही तर, घाबरायचे नाही शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करा. किंवा मोबाईल मधील लँडस्केप मोड निवडा. अर्ज करताना वैयक्तिक ई-मेल आणि चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे. तुम्हाला पुढील संपूर्ण माहितीची सूचना ई-मेल द्वारे किंवा एसएमएसद्वारे दिली जाणार आहे.

Konkan Railway Vacancy 2024 महत्वाच्या लिंक्स

📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात
येथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्ज
येथे क्लिक करा
💻 सविस्तर माहिती
येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट
येथे क्लिक करा

प्रिय मित्रांनो, कोकण रेल्वे भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना कोकण रेल्वे भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now