Indian Post Vacancy 2024 : नमस्कार, भारतीय डाक विभाग भरती 2024 ( Indian Post Vacancy 2024/GDS Recruitment 2024 ) यांच्या अंतर्गत तब्बल 44,228 पदांच्या मेगा भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. कारण ही भरती आपल्या देशातील डाक विभागाची आहे.
भारतीय डाक विभाग जनतेच्या सेवेसाठी विविध पदांवर दरवर्षी अनेक कर्मचाऱ्यांची भरती करत असते. त्याचप्रमाणे यावर्षी देखील अशीच भरतीची घोषणा भारतीय डाक विभागाने प्रसिद्ध केली आहे. सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. जर तुम्हालाही या भरतीचा अर्ज करण्याची इच्छा असेल तर, तुमची शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. भारतीय डाक विभाग भरती 2024 साठी तरुणांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2024 असणार आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ न लावता लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत, या मोहिमेत आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.
सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रीणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.
Indian Post Vacancy 2024 Important Matters / Important Points :
संपूर्ण जागा – भारतीय डाक विभाग भरती 44,228 पदांची मेगा भरती असणार आहे.
पदांचे नाव – भारतीय डाक विभाग ही भरती GDS – ब्रांच पोस्ट मास्टर ( BPM ) आणि GDS – ब्रांच पोस्ट मास्टर ( ABPM ) या दोन पदासाठी असणार आहे.
विभाग – या सदर भरतीचा विभाग भारतीय डाक विभाग असणार आहे.
भरती श्रेणी – सदर भरती केंद्र श्रेणी अंतर्गत असणार आहे.
शैक्षणिक पात्रता – भारतीय डाक विभाग भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठातून कमीत कमी 50% पेक्षा जास्त गुणांनी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज पद्धती – भारतीय डाक विभाग भरती 2024 साठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
अर्ज शुल्क – सदर भरतीस ऑनलाइन अर्ज सादर करताना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 100/- रुपये प्रति अर्ज शुल्क आकारले जाईल आणि आरक्षित प्रवर्गासाठी / महिलांसाठी अर्ज शुल्क माफ असेल.
मासिक वेतन – भारतीय डाक विभाग भरतीस नियुक्त उमेदवाराला 12,000/- रुपये ते 24,000/- रुपये एवढे मासिक वेतन पदानुसार देण्यात येणार आहे.
अर्जाची तारीख – सदर भरतीस पात्र उमेदवाराला 5 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
वयाची अट – भारतीय डाक विभाग भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 40 वर्ष यादरम्यान असणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारतभरात कोठेही नोकरी असेल.
Indian Post Vacancy 2024 Important Documents :
आवश्यक कागदपत्रे – तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज सादर करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. ती पुढील प्रमाणे…
- आधार कार्ड / पासपोर्ट / मतदान कार्ड / उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- 10वी गुणपत्रक
- डोमासाईल प्रमाणपत्र
- स्वाक्षरी
- MSCIT / आवश्यकतेनुसार इतर प्रमाणपत्र
Indian Post Vacancy 2024 Selection Process :
Indian Post Vacancy 2024 / भारतीय डाक विभाग भरती 2024 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेदरम्यान 10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांच्या गुणपत्रावरील गुणश्रेणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.व त्यांना थेट नोकरीवर नियुक्त करण्यात येईल. अधिक माहितीसाठी अधिकृत पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाचा आढावा घ्या. लिंक आपण लेखात दिलेली आहे.
Indian Post Vacancy 2024 Apply Process :
- सर्वप्रथम भारतीय पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- उमेदवाराला स्वतःची नोंदणी करावी लागेल, नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार करण्यासाठी उमेदवाराकडे त्याचा स्वतःचा सुरू असलेल्या ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.
- दोन्ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड उमेदवाराच्या ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक वर प्राप्त होईल.
- प्राप्त झालेला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. लॉगिन केल्यावर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग,UPI या ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरा यामध्ये महत्त्वाचे (SC/ST/PWD महिला) हीच नाही.
- नोंदणी आणि अर्ज शुल्क भरल्यानंतर उमेदवाराने Apply Online यावर क्लिक करावे. स्वतःची वैयक्तिक, शैक्षणिकव इतर महत्त्वाची माहिती भरून अर्ज भरा.
- यानंतर 20kb एवढ्या आकाराची सही व फोटो 50Kb एवढा अपलोड करावा.
- यानंतर राज्य निवडावे,जिल्हा निवडावा नंतर प्राधान्य क्रमांका नुसार गावे निवडावेत.
- ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराने नंतरच्या टप्प्यात कागदपत्राच्या पडताळणीसाठी आपण ज्या विभागात अर्ज केला आहे त्या विभागात विभागीय मुख्यालय निवडण्याचा सल्ला दिला जातो.
- यानंतर उमेदवाराने सदरील अर्जाची प्रिंट आऊट घ्यावी आणि भविष्यातील कामासाठी सुरक्षित ठेवावी.
- 5 ऑगस्ट 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. तो असमर्थ ठरविण्यात येईल.
- भारतीय डाक विभाग भरती 2024 दरम्यान अर्ज सादर करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्री चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये. अथवा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते.याची दखल घ्यावी.
- संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा / सबमिट करा आणि भरतीचा पुरेपूर लाभ घ्या.
Indian Post Vacancy 2024 Special Notification :
भारतीय डाक विभाग भरती 2024 साठी उमेदवार मोबाईलद्वारे अर्ज सादर करण्याचा प्रयन करत असतात. मोबाईलवर अर्ज सादर करताना वेबसाईट ओपन झाली नाही तर, घाबरायचे नाही शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करा. किंवा मोबाईल मधील लैंडस्केप मोड निवडा. अर्ज सादर करताना वैयक्तिक ई-मेल आयडी आणि चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे. तुम्हाला पुढील संपूर्ण माहितीची सूचना ई-मेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार आहे.
Indian Post Vacancy 2024 Important Links :
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
प्रिय मित्रांनो, भारतीय डाक विभाग भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना भारतीय डाक विभाग भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाता नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!