Indian Navy Bharti 2024 | भारतीय नौसेनेत वैद्यकीय सहाय्यक पदांची भरती ; संपूर्ण माहिती वाचा !

ही माहिती इतरांना शेअर करा.

Indian Navy Bharti 2024 : भारतीय नौदल भरती 2024 ( Indian Navy Bharti 2024/ Indian Navy Recruitment 2024 ) यांच्या अंतर्गत अनेक विविध पदांच्या मेगा भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. कारण ही भरती आपल्या देशाच्या भारतीय नौदलामध्ये वैद्यकीय सहाय्यक च्या विविध पदांसाठी असणार आहे.

Indian Navy Bharti 2024 / आपल्या देशातील तरुण भारतीय सैनिक, भारतीय हवाई दल, भारतीय नौदल, पोलीस भरती अशाच विविध सुरक्षा बल भरतीची खूप आतुरतेने वाट बघत असतात. या भरत्यांद्वारे यांना देशसेवेची संधी चालून येते. भारतीय सेनेत रुजू होण्याचे कित्येक तरुणांचे स्वप्न देखील असते. शिवाय सरकारी नोकरी आणि चांगला पगार याचाही प्रश्न मिटतो. अशाच तरुण युवकांसाठी ही एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. जर तुम्हालाही या भरतीस अर्ज करण्याची इच्छा असेल तर, तुमची शैक्षणिक पात्रता कमीत कमी 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. भारतीय नौसेना भरतीस तरुणांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2024 असणार आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ न लावता लवकरात लवकर अर्ज सादर करावा.

मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मोहिमेत आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रीणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका! आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.

Indian Navy Bharti 2024 Important Matters / Important Points :

संपूर्ण जागा – भारतीय नौदल भरती 2024 ही अनेक पदांसाठी भरती असून पदसंख्या निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव – ही भरती भारतीय नौसेना अंतर्गत वैद्यकीय सहाय्यक पदासाठी केली जाणार आहे.

विभाग – सदर भरतीचा विभाग भारतीय नौदल ( Indian Navy ) असणार आहे.

भरती श्रेणी – सदर भरती केंद्र श्रेणी अंतर्गत असणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदर भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे असून पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. त्याची संपूर्ण माहिती आपण पुढे लेखात दिलेली आहे.

अर्ज पद्धती – भारतीय नौदल भरती 2024 साठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ ( PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.

अर्ज शुल्क – भारतीय नौदल भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

मासिक वेतन – भारतीय नौदल भरती 2024 दरम्यान नियुक्त उमेदवाराला 30,000/- रुपये एवढे मासिक वेतन पदानुसार देण्यात येणार आहे.

अर्जाची तारीखसदर भरतीस पात्र उमेदवाराला 17 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.

वयाची अट – भारतीय नौदल भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्ष ते 25 वर्ष या दरम्यान असले पाहिजे.

नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारतभरात कोठेही नोकरी असेल.

हेही वाचा : MSRTC Mumbai Bharti 2024 | 10 वी उत्तीर्ण असाल तर, एसटी महामंडळ, मुंबई अंतर्गत चालक पदासाठी त्वरित अर्ज करा !

Indian Navy Bharti 2024 Education Qualification :

Indian Navy Bharti 2024 / भारतीय नेवी भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठातून 50% पेक्षा जास्त गुणांनी कमीत कमी 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. शैक्षणिक पात्रतेदरम्यान उमेदवाराचे शिक्षण चालूच असेल तर, तो उमेदवार भरतीस अपात्र ठरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.

Indian Navy Bharti 2024 Physical Eligibility :

सदरील भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रते सोबतच शारीरिक पात्रता ही खूप महत्त्वाची असणार आहे. पुरुष उमेदवारांसाठी 6:30 मिनिटात 1.6 km धावणे, 20 उठक बैठक, 15 पुशप्स, 15 वाकलेला गुडघा सीट अप. तसेच कुठलीही मैदानी क्रीडा पात्रता अवघत असणे आवश्यक आहे.

Indian Navy Bharti 2024 Selection Process :

Indian Navy Bharti 2024 या भरतीस अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड हे 4 वेगवेगळ्या पद्धतीने होईल. सर्वप्रथम परीक्षा घेतली जाईल, परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाईल, शारीरिक चाचणी पास झालेल्या उमेदवारांचे कागदपत्र तपासणी केली जाईल, शेवटी चिकित्सा परीक्षण/ वैद्यकीय चाचणी केली जाईल. त्यासाठी उमेदवाराची तयारी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.

Indian Navy Bharti 2024 Important Documents :

आवश्यक कागदपत्रे – तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज सादर करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. ती पुढील प्रमाणे…

  • आधार कार्ड/ मतदान कार्ड/ पासपोर्ट/ उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला / TC
  • शैक्षणिक कागदपत्रे / प्रमाणपत्रे
  • जातीचा दाखला/ प्रमाणपत्र
  • उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Indian Navy Bharti 2024 Apply Process :

  1. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
  2. भारतीय नौदल भरती 2024 / Indian Navy Bharti 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
  3. भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा.
  4. अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा किंवा स्कॅन करा.
  5. सदर भरतीस सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
  6. 17 सप्टेंबर 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. तो असमर्थ ठरविण्यात येईल.
  7. भारतीय नौदल भरती 2024 दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये. अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते.
  8. संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा आणि भरतीचा पुरेपूर लाभ घ्या.

Indian Navy Bharti 2024 Special Notification :

Indian Navy Bharti 2024

भारतीय नौदल भरती 2024 साठी उमेदवार मोबाईलद्वारे अर्ज करण्याचा प्रयत्न करत असतात. मोबाईलवर अर्ज करताना वेबसाईट ओपन झाली नाही तर, घाबरायचे नाही शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करा. किंवा मोबाईल मधील लैंडस्केप मोड निवडा. अर्ज सादर करताना वैयक्तिक ई-मेल आयडी आणि चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे. तुम्हाला पुढील संपूर्ण माहितीची सूचना इमेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार आहे.

Indian Navy Bharti 2024 Important Links :

📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्ज (07 सप्टेंबर 2024 पासून)येथे क्लिक करा

प्रिय मित्रांनो, भारतीय नौदल भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना भारतीय नौदल भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now