Ahmednagar DCC Bank Vacancy 2024 : नमस्कार, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 ( Ahmednagar DCC Bank Vacancy 2024 / Ahmednagar District Co-operative Central Bank Vacancy 2024 ) यांच्या अंतर्गत तब्बल 700 पदांच्या मेगा भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. कारण ही भरती आपल्या महाराष्ट्र राज्यातील एका प्रतिष्ठित बँकेची आहे.अहमदनगर हे फक्त शहरच नव्हे तर, आपल्या महाराष्ट्र राज्यातला क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा देखील आहे. आणि अशा ठिकाणी नोकरी करिता युवा वर्ग खूप उत्सुक दिसून येतो.
Ahmednagar DCC Bank Vacancy 2024 या भरती दरम्यान क्लेरिकल, वाहन चालक, सुरक्षा रक्षक, जनरल मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर अशी अनेक पदे भरण्यात येणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दरवर्षी विविध ठिकाणी विविध पदांसाठी भरती काढत असते. तरुणांसाठी ही एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. जर तुम्हालाही या भरतीचा अर्ज करण्याची इच्छा असेल तर, तुमची शैक्षणिक पात्रता आवश्यक असणे गरजेचे आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2024 असणार आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ न लावता लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत, या मोहिमेत आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.
सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रीणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.
Ahmednagar DCC Bank Vacancy 2024 Important Matters / Important Points :
संपूर्ण जागा – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 700 पदांची मेगा भरती केली जाणार आहे.
पदांचे नाव – ही भरती अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांसाठी असणार आहे. त्याची सविस्तर माहिती आपण पुढील तक्त्याद्वारे जाणून घेऊयात.
पदांचे नाव | रिक्त जागा |
क्लेरिकल / Clerical | 687 |
वाहनचालक / Driver | 4 |
सुरक्षारक्षक / security guard | 5 |
जनरल मॅनेजर (संगणक) / General Manager (Computer) | 1 |
मॅनेजर (संगणक) / Manager (Computer) | 1 |
डेप्युटी मॅनेजर (संगणक) / Deputy Manager (Computer) | 1 |
इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) / Incharge First Grade (Computer) | 1 |
विभाग – Ahmednagar DCC Bank Vacancy 2024 या सदर भरतीचा विभाग अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असणार आहे.
भरती श्रेणी – सदर भरती राज्यश्रेणी अंतर्गत असणार आहे.
शैक्षणिक पात्रता – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदानुसार असणार आहे. त्याची सविस्तर माहिती आपण पुढे लेखात दिलेली आहे.
अर्ज पद्धती – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 साठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
मासिक वेतन – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीस नियुक्त उमेदवाराला 12,000/- रुपये ते 75,000/- रुपये एवढे मासिक वेतन पदानुसार देण्यात येणार आहे.
अर्जाची तारीख – सदर भरतीस पात्र उमेदवाराला 27 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
वयाची अट – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्ष ते 45 वर्ष या दरम्यान असणे आवश्यक आहे. त्याची आवश्यकता पदानुसार असणार आहे. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
अर्ज शुल्क – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून पदानुसार प्रति अर्ज शुल्क आकारले जाईल. त्याची सविस्तर माहिती आपण पुढील तक्त्याद्वारे जाणून घेऊ.
पदांचे नाव | अर्ज शुल्क |
क्लेरिकल / Clerical | 750/- रुपये |
वाहनचालक / Driver | 700/- रुपये |
सुरक्षारक्षक / security guard | 700/- रुपये |
जनरल मॅनेजर (संगणक) / General Manager (Computer) | 885/- रुपये |
मॅनेजर (संगणक) / Manager (Computer) | 885/- रुपये |
डेप्युटी मॅनेजर (संगणक) / Deputy Manager (Computer) | 885/- रुपये |
इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) / Incharge First Grade (Computer) | 885/- रुपये |
नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला अहमदनगर/ अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये नोकरी असणार आहे.
Ahmednagar DCC Bank Vacancy 2024 Education Qualification :
Ahmednagar DCC Bank Vacancy 2024/ अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदानुसार असणार आहे.
क्लेरिकल / Clerical : उमेदवार शासनमान्य विद्यापीठातून कुठल्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, त्याची एमएससीआयटी( MSCIT ) पूर्ण असणे आवश्यक आहे. किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.
वाहनचालक / Driver : उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे,त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना ( Driving Licence) असणे आवश्यक आहे.
सुरक्षारक्षक / security guard : या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठातून कुठल्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
जनरल मॅनेजर (संगणक) / General Manager (Computer) : BE/ B.Tech / MCA/ MCS /ME पूर्ण असणे आवश्यक आहे.
मॅनेजर (संगणक) / Manager (Computer) : BE/ B.Tech / MCA/MCS पूर्ण असणे आवश्यक आहे.
डेप्युटी मॅनेजर (संगणक) / Deputy Manager (Computer) : BE/ B.Tech / MCA/ MCS पूर्ण असणे आवश्यक आहे.
इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) / Incharge First Grade (Computer) : BE/ B.Tech / MCA/MCS
उमेदवाराचे शैक्षणिक पात्रतेदरम्यान शिक्षण चालूच असेल तर, तो उमेदवार भरतीस अपात्र ठरविण्यात येईल. असा उमेदवार भरतीमध्ये सहभागी होऊ शकत नाही.
Ahmednagar DCC Bank Vacancy 2024 Important Documents :
आवश्यक कागदपत्रे – तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज सादर करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. ती पुढील प्रमाणे…
- आधार कार्ड / पासपोर्ट / मतदान कार्ड / उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवाशी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला / TC
- जातीचा दाखला / प्रमाणपत्र
- उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT / आवश्यकतेनुसार इतर प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Ahmednagar DCC Bank Vacancy 2024 Selection Process :
Ahmednagar DCC Bank Vacancy 2024 / अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड विविध टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. सर्वप्रथम उमेदवारांची कॉम्प्युटर / संगणकाद्वारे बहुपर्यायी ( MCQ) चाचणी घेण्यात येईल. ही ऑनलाइन परीक्षा 90 गुणांसाठी 90 मिनिटांत 90 प्रश्न विचारले जातील. ती बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान ( General Knowledge ) आणि चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी, गणित, संगणक,माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी या विषयांच्या आधारे असेल.
त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची / दस्ताऐवजांची तपासणी केली जाईल आणि शेवटी उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. या सर्व टप्प्यांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची संबंधित पदासाठी निवड केली जाईल. व त्यासाठी उमेदवाराची तयारी असणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करा. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या. किंवा अधिकृत पीडीएफ ( PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.
Ahmednagar DCC Bank Vacancy 2024 Apply Process :
- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 साठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
- Ahmednagar DCC Bank Vacancy 2024 / अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ ( PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
- भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करा.
- अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा किंवा स्कॅन करा.
- सदर भरतीस सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
- 27 सप्टेंबर 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. तो असमर्थ ठरविण्यात येईल.
- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 दरम्यान अर्ज सादर करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये. अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते. याची दखल घ्यावी.
- संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा आणि भरतीचा पुरेपूर लाभ घ्या.
Ahmednagar DCC Bank Vacancy 2024 Special Notification :
Ahmednagar DCC Bank Vacancy 2024 / अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 साठी उमेदवार मोबाईलद्वारे अर्ज सादर करण्याचा प्रयन करत असतात. मोबाईलवर अर्ज सादर करताना वेबसाईट ओपन झाली नाही तर, घाबरायचे नाही शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करा. किंवा मोबाईल मधील लैंडस्केप मोड निवडा. अर्ज सादर करताना वैयक्तिक ई-मेल आयडी आणि चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे. तुम्हाला पुढील संपूर्ण माहितीची सूचना ई-मेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार आहे.
Ahmednagar DCC Bank Vacancy 2024 Important Links :
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
प्रिय मित्रांनो, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाता नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!