Forest Guard Bharti 2024 : नमस्कार, महाराष्ट्र वन विभाग भरती 2024 ( Forest Guard Bharti 2024 / Forest Department Maharashtra Recruitment 2024 ) यांच्या अंतर्गत तब्बल 1684 पदांच्या मेगा भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. कारण ही भरती आपल्या महाराष्ट्र राज्याच्या वन विभागामध्ये केली जाणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल आढळून येते. जंगलांमध्ये अनेक प्रकारची तस्करी करणारे लोक किंवा प्राण्यांचे शिकार करून त्यांच्या अवयवांचा व्यापार करणारे लोक आढळून येतात. अशाच वाईट प्रवृत्तीच्या लोकांवर आळा घालण्यासाठी आणि जंगलाची निगा / काळजी घेण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य वन विभागामध्ये दरवर्षी अनेक पदांसाठी भरतीची घोषणा जाहीर करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षी देखील ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
Forest Guard Bharti 2024 : राज्यातील तरुण वर्ग अशाच भरतीची वाट पाहत असतो. त्यांच्यासाठी ही एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. जर तुम्हालाही या भरतीस अर्ज करण्याची इच्छा असेल तर, तुमची शैक्षणिक पात्रता आणि शारीरिक पात्रता अटी शर्ती प्रमाणे आवश्यक असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र वन विभाग भरती 2024 साठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. ती जाहीर होताच त्याची पूर्ण अपडेट आपल्या व्हाट्सअप ग्रुप द्वारे कळविण्यात येईल. त्यामुळे आपण जास्त वेळ न लावता लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत, या मोहिमेत आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.
सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रीणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.
Forest Guard Bharti 2024 Important Matters / Important Points :
संपूर्ण जागा – महाराष्ट्र राज्य वन विभाग भरती 2024 ही 1684 पदांची मेगा भरती असणार आहे.
पदांचे नाव – ही भरती महाराष्ट्र वन विभागामध्ये 1684 विविध पदांसाठी असणार आहे.
विभाग – या सदर भरतीचा विभाग महाराष्ट्र वन विभाग असणार आहे.
भरती श्रेणी – सदर भरती महाराष्ट्र राज्य श्रेणी अंतर्गत असणार आहे.
शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्र राज्य वन विभाग भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदानुसार असणार आहे. त्याची सविस्तर माहिती आपण लेखात दिलेली आहे.
अर्ज पद्धती – महाराष्ट्र राज्य वन विभाग भरती 2024 साठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
मासिक वेतन – महाराष्ट्र वन विभाग भरतीस नियुक्त उमेदवाराला अंदाजे 35,000/- रुपये ते 60,000/- रुपये या दरम्यान पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ ( PDF ) जाहिरातीचा आढावा घ्या.
अर्जाची तारीख – सदर भरतीस पात्र उमेदवाराला लवकरात लवकर अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही.
वयाची अट – महाराष्ट्र राज्य वन विभाग भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 27 वर्ष या दरम्यान असणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोठेही नोकरी असेल.
हेही वाचा : MSF Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळामध्ये अनेक पदांसाठी भरती ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
Forest Guard Bharti 2024 Education Qualification :
Forest Guard Bharti 2024/ महाराष्ट्र राज्य वन विभाग भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठातून 50% पेक्षा जास्त गुणांनी कमीत कमी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेदरम्यान उमेदवाराचे शिक्षण चालूच असेल तर, तो उमेदवार भर्तीस अपात्र ठरविण्यात येईल. असा उमेदवार भरती मध्ये सहभागी होऊ शकत नाही.
Forest Guard Bharti 2024 Important Document :
आवश्यक कागदपत्रे – तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज सादर करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. ती पुढील प्रमाणे…
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला / TC
- जातीचा दाखला/ प्रमाणपत्र
- उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
- डोमासाईत प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Forest Guard Bharti 2024 Selection Process :
Forest Guard Bharti 2024/ महाराष्ट्र राज्य वन विभाग भरती 2024 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड अनेक टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. सर्वप्रथम अर्ज केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची किंवा दस्ताऐवजांची तपासणी केली जाईल. आणि शेवटच्या टप्प्यात उमेदवारांची शारीरिक चाचणी ( Physical Test ) केली जाईल. त्यासाठी उमेदवारांची तयारी असणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करा. अधिक माहितीसाठी अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
Forest Guard Bharti 2024 Apply Process :
- Forest Guard Bharti 2024/महाराष्ट्र राज्य वन विभाग भरती 2024 या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
- Forest Guard Bharti 2024/ महाराष्ट्र राज्य वन विभाग भरती 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
- भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करा.
- अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा किंवा स्कॅन करा.
- सदर भरतीस सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
- Forest Guard Bharti 2024 या भरतीस अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून जाहीर झालेली नाही. अर्ज करण्याची अंतिम तारीख कधी पण जाहीर होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करा. अंतिम तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. तो असमर्थ ठरविण्यात येईल.
- Forest Guard Bharti 2024/महाराष्ट्र राज्य वन विभाग भरती 2024 दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये. अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते. याची दखल घ्या.
- संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा आणि भरतीचा पुरेपूर लाभ घ्या.
Forest Guard Bharti 2024 Special Notification :
Forest Guard Bharti 2024/महाराष्ट्र राज्य वन विभाग भरती 2024 साठी उमेदवार मोबाईलद्वारे अर्ज सादर करण्याचा प्रयन करत असतात. मोबाईलवर अर्ज सादर करताना वेबसाईट ओपन झाली नाही तर, घाबरायचे नाही शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करा. किंवा मोबाईल मधील लैंडस्केप मोड निवडा. अर्ज सादर करताना वैयक्तिक ई-मेल आयडी आणि चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे. तुम्हाला पुढील संपूर्ण माहितीची सूचना ई-मेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार आहे.
Forest Guard Bharti 2024 Important Links :
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज (लवकरच सुरू) | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
प्रिय मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वन विभाग भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना महाराष्ट्र राज्य वन विभाग भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाता नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!