BMC CLERK VACANCY 2024| बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 1846 लेखनिक पदांची मेगा भरती! लवकर अर्ज करा

ही माहिती इतरांना शेअर करा.

BMC Clark Vacancy 2024 : नमस्कार, बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 (BMC Clerk Vacancy 2024/Brihanmumbai Municipal Corporation Clerk Recruitment 2024) यांच्या अंतर्गत तब्बल 1846 पदांच्या मेगा भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. असेच म्हणावे लागेल. कारण ही भरती आपल्या देशातील नावाजलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची असून, विविध विभागांमध्ये सरकारी नोकरीची आहे.

आपल्या राज्यातील शासकीय नोकरीच्या व चांगल्या पगाराच्या शोधात असलेल्या युवा आणि पात्र पिढीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आज कालच्या तरुणांमध्ये क्लर्क च्या नोकरीसाठी खूप उत्साह दिसून येतो. त्यांच्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 ही एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. जर तुम्हालाही या भरतीचा अर्ज करण्याची इच्छा असेल तर, तुमची शिक्षण पात्रता आवश्यक असणे गरजेचे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 9 सप्टेंबर 2024 आहे, त्यामुळे आपण वेळ न लावता लवकरात लवकर अर्ज सादर करावा.

BMC CLERK VACANCY 2024
BMC CLERK VACANCY 2024

मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरती अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता,आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मोहिमेत आवश्यक असणारी शिक्षण पात्रता, वयाची अट,पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क,अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदरील भरतीची घोषणा तुम्हाला,तुमच्या कुटुंबातील इतरांना, किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका! आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप वर टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.

BMC Clerk Vacancy 2024 महत्त्वाच्या बाबी / महत्त्वाचे मुद्दे :

संपूर्ण जागा – बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये 1846 पदांची रिक्त भरती केली जाणार आहे.

पदाचे नाव – ही भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये लेखनिक या पदासाठी असणार आहे.

विभाग – या सदर भरतीचा विभाग बृहन्मुंबई महानगरपालिका असणार आहे.

भरती श्रेणी – सदर भरती महाराष्ट्र राज्य सरकार श्रेणी अंतर्गत असणार आहे.

शिक्षण पात्रता – सदर भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शिक्षण पात्रता ही पदानुसार असणार आहे, त्याची संपूर्ण माहिती आपण लेखात दिलेली आहे.

अर्ज पद्धती – बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ (PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.

अर्ज शुल्क – बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून SC, ST व इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900/- रुपये तसेच OPEN, OBC खुल्या प्रवर्गासाठी 1000/- रुपये प्रति अर्ज शुल्क आकारले जाईल.

मासिक वेतन – बृहन्मुंबई महानगरपालिका भरती दरम्यान नियुक्त उमेदवाराला 25 हजार रुपये ते 81 हजार रुपये एवढे मासिक वेतन पदानुसार देण्यात येणार आहे.

अर्जाची तारीख – सदर भरती पात्र उमेदवाराला 20 ऑगस्ट 2024 ते 9 सप्टेंबर 2024 या दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करा आणि भरतीचा लाभ घ्या.

वयाची अट – बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय SC, ST व इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्ष तसेच महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी 3 ते 5 वर्षाची सूट असणार आहे.

नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला बृहन्मुंबई महानगरपालिके नोकरी असणार आहे.

BMC Clerk Vacancy 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त महानगरपालिका शहर आयुक्त डॉ. श्रीमती अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या भरतीची प्रक्रिया चालू आहे.

BMC Clerk Vacancy 2024 शैक्षणिक पात्रता व निकष:

BMC Clerk Vacancy 2024 / बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठातून कमीत कमी 12 वी पास असणे गरजेचे आहे.विज्ञान, वाणिज्य,कला, विधी, किंवा कुठल्याही शाखेचा पदवीधर असून 45% पेक्षा जास्त मार्कांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र, मराठी व इंग्रजी उत्तीर्ण असले पाहिजे. उमेदवाराची MSCIT उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, उमेदवाराचे इंग्रजी व मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे कॉम्प्युटर मधील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस, सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट या सर्व गोष्टींचे चांगले ज्ञान असले पाहिजे. उमेदवाराचे शिक्षण पात्रतेदरम्यान शिक्षण चालूच असेल तर, उमेदवार भरतीस अपात्र ठरविण्यात येईल. असा उमेदवार भरतीमध्ये सहभागी होऊ शकत नाही.

BMC Clerk Vacancy 2024 आवश्यक कागदपत्रे :

आवश्यक कागदपत्रे – तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे, ती पुढील प्रमाणे.

1) आधार कार्ड / पासपोर्ट / मतदान कार्ड/ उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा

2) पासपोर्ट साईज फोटो

3) रहिवाशी दाखला / अधिवास प्रमाणपत्र

4) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र /TC

5) शैक्षणिक कागदपत्रे / प्रमाणपत्रे

6) जातीचा दाखला/ प्रमाणपत्र

7) नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र

8) डोमासाईल प्रमाणपत्र

9) MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यकतेप्रमाणे

10) अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र

BMC Clerk Vacancy 2024 अर्ज प्रक्रिया :

1) या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.

2) बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 /BMC Clerk Vacancy 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ (PDF) किंवा अधिकृत संकेतस्थळावर नक्की भेट द्या.

3) भेट दिल्यावर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा.

4) सदर भरतीस सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.

5) अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती,आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडा.

6) नऊ सप्टेंबर 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

7) बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये, अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते. याची दखल घ्यावी.

8) संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा, अर्ज सादर करा आणि भरतीचा फायदा घ्या.

BMC Clerk Vacancy 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेने उमेदवारांच्या मदतीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी एक संपर्क क्रमांक जारी केलेला आहे.9513253233 या क्रमांकावर संपर्क साधून उमेदवार आपली शंका दूर करू शकतो.सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही संपर्क सेवा चालू असेल.

BMC Clerk Vacancy 2024 निवड प्रक्रिया :

BMC Clark Vacancy 2024 / या भरतीस अर्ज केलेल्या उमेदवाराची निवड ऑनलाइन पद्धतीने बहुपर्यायी चाचणी किंवा एम सी क्यू (MCQ) परीक्षेद्वारे केली जाऊ शकते. ऑनलाइन परीक्षेमध्ये मिळवलेल्या गुणांच्या साह्याने उमेदवारांची निवड केली जाऊ शकते. या ऑनलाइन परीक्षेत 100 मिनिटात 100 मार्कासाठी 100 प्रश्न विचारले जातील, ती मराठी भाषा, इंग्रजी भाषा, जनरल नॉलेज, बुद्धिमत्ता या विषयांच्या आधारे असेल. त्यासाठी उमेदवाराची तयारी असणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

BMC CLERK VACANCY 2024 Important Links :

📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात
येथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्ज
येथे क्लिक करा
💻 सविस्तर माहिती
येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट
येथे क्लिक करा

प्रिय मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज करताना बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 द्वारे जाहीर केलेल्या अधिकृत पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now