IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024 : नमस्कार, भारतीय हवाई दल अग्निवीर वायू भरती 2024 (IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024 / Indian Air Force Agniveervayu Sports Recruitment 2024) यांच्या अंतर्गत मेगा भरती ची घोषणा जाहीर करण्यात आली आहे.तरुणांसाठी भारतीय हवाई दलामध्ये भरती होण्यासाठीची ही एक सुवर्णसंधी आहे.कारण आपल्या देशातील तरुणांमध्ये अलीकडच्या काळात अग्निवीर भरतीसाठी खूप उत्साह दिसून येत आहे.
आपल्या देशातील तरुण भारतीय सैनिक, भारतीय हवाई दल, भारतीय नेव्ही या भरत्यांसाठी खूप वाट बघत असतात. त्यांच्यासाठी ही एक आनंदाची आणि मोठी बातमी असू शकते. जर तुम्हालाही या भरतीस अर्ज करण्याची इच्छा असेल तर, तुमची शिक्षण पात्रता कमीत कमी 12 वी पास असणे गरजेचे आहे. भारतीय हवाई दल अग्निवीर वायू भरतीस तरुणांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे आपण वेळ न लावता लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरती अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मोहिमेत आवश्यक असणारी शिक्षण पात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती,परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.
सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना, तुमच्या मित्र-मैत्रिणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका! आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.
IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024 महत्त्वाच्या बाबी / महत्वाचे मुद्दे :
- संपूर्ण जागा : भारतीय हवाई दल अग्निवीर वायू भरती 2024 पदांची संख्या घोषित करण्यात आलेली नाही. ती घोषित होताच आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर अपडेट देण्यात येईल.
- पदाचे नाव : ही भरती भारतीय हवाई दलामध्ये अग्निवीर वायू ( Sports) या पदासाठी असणार आहे
- विभाग : या सदर भरतीचा विभाग भारतीय हवाई दल असणार आहे.
- भरती श्रेणी : सदर भरती केंद्र श्रेणी अंतर्गत असणार आहे.
- शिक्षण पात्रता : सदर भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शिक्षण पात्रता ही पदानुसार असणार आहे, त्याची संपूर्ण माहिती आपण लेखात पुढे दिलेली आहे.
- अर्ज पद्धती : भारतीय हवाई दल अग्नीवीर वायू भरती 2024 साठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो. अधिक माहितीसाठी अंतर्गत पीडीएफ (PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.
- अर्ज शुल्क : भारतीय हवाई दल अग्नीवीर वायू भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून 100 रुपये प्रति अर्ज एवढे शुल्क आकारण्यात येईल.
- मासिक वेतन : सदर भरती दरम्यान नियुक्त उमेदवाराला वेगवेगळ्या पदा नुसार मासिक वेतन देण्यात येणार आहे, अधिक माहितीसाठी अधिकृत पीडीएफ (PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.
- अर्जाची तारीख : सदर भरतीस पात्र उमेदवाराला 20 ऑगस्ट 2024 ते 29 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि भरतीचा लाभ घ्या.
- वयाची अट : भारतीय हवाईदल अग्निवीर वायू भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या तरुण उमेदवाराचे वय 21 वर्ष ते 25 वर्ष या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी असेल.
IAF Agniveervayu Sports Quata Bharti 2024 शिक्षण पात्रता :
IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024 / भारतीय हवाई दल अग्नीवीर वायू भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.
उमेदवार 12 वी मध्ये 50% पेक्षा जास्त मार्कांनी पास असला पाहिजे.(मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, इंग्लिश ) किंवा इंजीनियरिंग डिप्लोमा ( मेकॅनिक, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स,ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ) किंवा गैर व्यावसायिक विषयासोबत दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम पास त्याचप्रमाणे कुठलीही क्रीडा पात्रता असणे गरजेचे आहे.
उमेदवाराचे शिक्षण पात्रतेदरम्यान शिक्षण चालूच असेल तर, उमेदवार भरती अपात्र ठरविण्यात येईल. असा उमेदवार भरती मध्ये सहभागी होऊ शकत नाही.
IAF Agniveervayu Sport Quato 2024 आवश्यक कागदपत्रे:
आवश्यक कागदपत्रे – तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज सादर करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. ती पुढील प्रमाणे…
- आधार कार्ड / पासपोर्ट / मतदान कार्ड / उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवाशी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला / TC
- जातीचा दाखला / प्रमाणपत्र
- उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
- डोमासाईल प्रमाणपत्र
IAF Agniveervayu Sport Quato 2024 निवड प्रक्रिया :
IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024 / भारतीय हवाई दल अग्नीवीर वायू भरती 2024 या भरतीस अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड त्यांच्या शारीरिक पात्रतेनुसार, शैक्षणिक पात्रतेनुसार, लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. त्यानंतर त्यांना संबंधित भरती बाबतचे ज्ञान दिले जाईल. किंवा ट्रेनिंग दिले जाईल. अशी पात्र उमेदवाराची निवड केली जाईल त्यासाठी उमेदवाराची तयारी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला नक्की भेट द्या. लिंक आपण लेखात खाली दिलेली आहे.
IAF Agniveervayu Sport Quato 2024 अर्ज प्रक्रिया :
1) या भरतीसाठी उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
2) भारतीय हवाई दल अग्नीवीर वायू भरती 2024 /IAF Agniveervayu Sports Quata Bharti 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ (PDF) किंवा अधिकृत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
3) भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाइन अर्ज करा.
4) सदर भरती सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्यास तो गृहीत धरला जाणार नाही.
5) अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती, आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती योग्य त्या ठिकाणी सुयोग्य पद्धतीने प्रविष्ट करा, जेणेकरून तुमचा अर्ज समर्थक केला जाणार नाही.
6) 29 ऑगस्ट 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
7) भारतीय हवाई दल अग्नीवीर वायू भरती 2024 दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये, अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते. याची दखल घ्यावी.
8) संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा, अर्ज सादर करा आणि भरतीचा फायदा घ्या.
IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024 Important Links :
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
प्रिय मित्रांनो, भारतीय हवाई दल अग्नीवीर वायू भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते.त्यामुळे आपण अर्ज करताना भारतीय हवाईदल अग्नीवीर वायू भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!