Jalgaon Mahanagarpalika vacancy 2024 : नमस्कार, जळगाव महानगरपालिका भरती 2024 ( Jalgaon Municipal Corporation Bharti 2024 / Jalgaon Mahanagarpalika vacancy 2024 ) यांच्या अंतर्गत तब्बल 45 पदांच्या मेगा भरतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तरुणांसाठी सरकारी नोकरीचा हा एक उत्तम पर्याय असणार आहे, असेच म्हणावे लागेल. कारण जळगाव महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज केलेल्या उमेदवाराला कोणतीही परीक्षा देण्याची गरज पडणार नाही , पात्र उमेदवाराला थेट नोकरी देण्यात येईल.
ही भरती 45 रिक्त जागांची असून, स्टाफ नर्स पुरुष/ स्टाफ नर्स महिला /MPW पुरुष या पदांसाठी असणार आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावा लागणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी बारावी पास असणे गरजेचे आहे. उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 असणार आहे. त्यामुळे आपण वेळ न लावता लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता तर, आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तर रित्या देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मोहिमेत आवश्यक असणारी शिक्षण पात्रता, पदांची संपूर्ण माहिती, वयाची अट, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.
सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका! आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.
Jalgaon Mahanagar Palika Vacancy 2024 महत्त्वाच्या बाबी / महत्त्वाचे मुद्दे :
- संपूर्ण जागा : जळगाव महानगरपालिका मध्ये 45 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
- पदाचे नाव : ही भरती जळगाव महानगरपालिकेत स्टाफ नर्स पुरुष / महिला, MPW पुरुष या पदांसाठी असणार आहे.
- विभाग : या सदरील भरतीचा विभाग जळगाव महानगरपालिका असणार आहे.
- भरती श्रेणी : सदरील भरती महाराष्ट्र राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
- शिक्षण पात्रता : सदर भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शिक्षण पात्रता ही पदानुसार असणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण लेखात दिली आहे.
- अर्ज पद्धती : जळगाव महानगरपालिका भरती 2024 साठी उमेदवाराला पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. अधिक माहिती अंतर्गत पीडीएफ (PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.
- अर्ज शुल्क : जळगाव महानगरपालिका भरती 2024 ही करणाऱ्या उमेदवाराकडून SC/ST/ महिला 350 रुपये व OPEN/OBC 500 रुपये प्रति अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.
- मासिक वेतन : सदर भरती दरम्यान नियुक्त उमेदवाराला 18 हजार रुपये ते 20 हजार रुपये एवढे मासिक वेतन पदानुसार देण्यात येणार आहे, अधिक माहितीसाठी अधिकृत पीडीएफ (PDF) जाहिरातीचा आढावा घ्या.
- अर्ज तारीख : सदर भरतीस पात्र उमेदवार 12 ऑगस्ट 2024 ते 20 ऑगस्ट 2024 या दरम्यान अर्ज सादर करू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करा आणि भरतीचा लाभ घ्या.
- वयाची अट : जळगाव महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय SC/ST 18 ते 43 वर्ष आणि OPEN /OBC 18 ते 38 वर्ष या दरम्यान असले पाहिजे.
- नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला जळगाव महानगरपालिका मध्ये नोकरी असणार आहे.
- अर्ज देण्याचा पत्ता : या भरतीसाठी उमेदवार हा अर्ज पोस्टाद्वारे देऊ शकतो.अर्ज पाठवण्याचा पत्ता वैद्यकीय आरोग्य अधिकारी/ प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहूनगर जळगाव – 425001असेल. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
Jalgaon Mahanagarpalika Vacancy 2024 शिक्षण पात्रता व निकष:
Jalgaon Mahanagarpalika vacancy 2024 / जळगाव महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शिक्षण पात्रता ही पदांवर अवलंबून असणार आहे.
- स्टाफ नर्स पुरुष : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता जी एन एम (GNM), बी एस सी (B. Sc) नरसिंग असणे आवश्यक असून या पदासाठी 3 रिक्त जागा असतील.
- स्टाफ नर्स महिला : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता जी एन एम (GNM), बीएससी (BSC) नरसिंग असणे आवश्यक असून या पदासाठी 18 रिक्त जागा असतील.
- MPW पुरुष : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण विज्ञान शाखेतून आणि उमेदवाराचे पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पूर्ण किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण असावा. या पदासाठी 24 रिक्त जागा असतील. उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेदरम्यान शिक्षण चालू असेल तर, उमेदवार भरतीस अपात्र ठरविण्यात येईल. असा उमेदवार भरतीमध्ये सहभागी होऊ शकत नाही.
Jalgaon Mahanagarpalika Vacancy 2024 भरतीस लागणारी आवश्यक कागदपत्रे :
आवश्यक कागदपत्रे – तरुण युवकांना या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे ती पुढील प्रमाणे.
1) आधार कार्ड/पासपोर्ट / मतदान कार्ड / उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा
2) पासपोर्ट साईज फोटो
3) रहिवासी दाखला / अधिवास प्रमाणपत्र
4) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र /TC
5) शैक्षणिक कागदपत्रे/ प्रमाणपत्र
6) जातीचा दाखला/ प्रमाणपत्र
7) नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
8) डोमासाईल प्रमाणपत्र
9) MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यकतेप्रमाणे
10) अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र
Jalgaon Mahanagarpalika Vacancy 2024 निवड प्रक्रिया :
Jalgaon Mahanagarpalika vacancy 2024 / या भरतीस अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखत करून घेतली जाऊ शकते. लेखी परीक्षेद्वारे केली जाऊ शकते. ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाऊ शकते. निवड करते अधिकारी त्यांच्या विवेक बुद्धीनुसार निवड प्रक्रिया करू शकतात. जमा झालेल्या अर्जावरून मेरिट लिस्ट तयार केली जाऊ शकते. मेरिट लिस्ट गुण श्रेणी द्वारे निवड प्रक्रिया केली जाऊ शकते. त्यासाठी उमेदवाराची तयारी असणे आवश्यक आहे. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी लेखात दिलेल्या पीडीएफ लिंक वर क्लिक करा.
Jalgaon Mahanagarpalika Vacancy 2024 अर्ज प्रक्रिया :
1) या भरतीसाठी उमेदवाराला ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
2) जळगाव महानगरपालिका भरती 2024 / Jalgaon Mahanagarpalika vacancy 2024 साठी अर्ज करण्याआधी अधिकृत पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
3) भेट दिल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑफलाइन अर्ज करा.
4) सदर भरतीस सादर केलेल्या अर्जात वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
5) अर्ज सादर करतेवेळी वैयक्तिक माहिती, आणि स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण भरा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडा.
6) 20 ऑगस्ट 2024 या तारखेच्या नंतर केलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
7) जळगाव महानगरपालिका भरती 2024 दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये, अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते. याची दखल घ्यावी.
8) संपूर्ण माहिती भरा, योग्य ते कागदपत्रे जोडा, अर्ज सादर करा आणि भरतीचा लाभ घ्या.
JALGAON MAHANAGARPALIKA VACANCY 2024 Important Links :
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
प्रिय मित्रांनो, जळगाव महानगरपालिका भरती 2024 ऑफलाइन अर्ज करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते.त्यामुळे आपण अर्ज करताना जळगाव महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत जाहीर केलेल्या पीडीएफ (PDF) किंवा अधिकृत संकेतस्थळाला नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!