INDIAN BANK VACANCY 2024 : नमस्कार, ही भरती स्थानिक बँक ऑफिसर साठी 300 पदांकरिता असणार आहे.‘ इंडियन बँके अंतर्गत ’ भरतीची घोषणा जाहीर केली आहे. ‘ इंडियन बँक ’ ही देशातील सार्वजनिक भागातील सुप्रसिद्ध व बलाढ्य बँकांपैकी एक मानली जाणारी बँक आहे. या बँकेत नोकरी करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते, अशा तरुणांसाठी ही भरती म्हणजे सुवर्णसंधी आहे, असेच म्हणावे लागेल ; कारण ही भरती आपल्या देशातील एका प्रतिष्ठित बँकेची असून तरुण युवकांना सरकारी नोकरीचा उत्तम पर्याय प्रधान करते. इंडियन बँकेत भरती करिता तरुण युवकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2024 असेल.
मित्रांनो, तब्बल 300 जागांच्या या भरतीसाठी तुम्ही सुद्धा अर्ज करण्याची इच्छा बाळगत असाल तर, आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मोहिमेत आवश्यक असणारी शिक्षण पात्रता, वय मर्यादा, मासिक वेतन, परीक्षा फी, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.
सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रीणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.
Indian Bank vacancy 2024 महत्त्वाच्या बाबी / महत्त्वाचे मुद्दे :
1) संपूर्ण जागा – इंडियन बँकेत 300 विविध पदांची भरती केली जाणार आहे.
2) पदांचे नाव – ही भरती स्थानिक बँक अधिकारी ( local bank officer) या पदांसाठी असणार आहे.
3) शिक्षण पात्रता – सदरील भरती अर्ज करणाऱ्या तरुण युवकाचे शिक्षण शासनमान्य विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण असली पाहिजे.
4) अर्जाची पद्धत – इंडियन बँक भरती पात्र उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
5) मासिक वेतन – नियुक्त उमेदवाराला 48500 हजार रुपयेते 85,500 हजार रुपये एवढे मासिक वेतन, पदानुसार दिले जाणार आहे.
6) अर्ज शुल्क – SC/ST अर्जाची शुल्क असणार नाही आणि OPEN/OBC 500 रुपये प्रति अर्ज शुल्क आकारले जाईल.
7) अर्जाची तारीख – पात्र उमेदवार 13 ऑगस्ट 2024 ते 2 सप्टेंबर 2024 या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.
8) विभाग – या सदर भरतीचा विभाग इंडियन बँक विभाग असणार आहे.
9) भरती श्रेणी – सदर भरती केंद्र श्रेणी अंतर्गत असणार आहे.
Indian Bank vacancy 2024 नोकरीचे ठिकाण :
इंडियन बँक भरती 2024 मध्ये नियुक्त केलेल्या उमेदवाराला नोकरीसाठी देशातील विविध राज्यात जावे लागणार आहे ते आपण पुढील सारणी द्वारे जाणून घेऊया.
राज्य | जागा |
तामिळनाडू/ पुद्दुचेरी | 160 |
आंध्र प्रदेश व तेलंगाना | 50 |
महाराष्ट्र | 40 |
कर्नाटक | 35 |
गुजरात | 15 |
एकूण | 300 |
Indian Bank vecancy 2024 उमेदवारांची निवड प्रक्रिया :
INDIAN BANK VACANCY 2024 : या भरतीस अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड बँक मुलाखात करून घेऊ शकते. लेखी परीक्षा घेऊन करू शकते. किंवा ऑनलाईन परीक्षा घेऊन करू शकते. पात्र उमेदवाराची निवड बँक आपल्या स्वइच्छेप्रमाणे करू शकते. त्यासाठी उमेदवाराची तयारी असणे आवश्यक आहे.
Indian Bank vacancy 2024 आवश्यक पात्रता व निकष:
INDIAN BANK VACANCY 2024 : या भरतीस अर्ज करणाऱ्या तरुण उमेदवाराचे शिक्षण सरकारची मान्यता असलेल्या विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण असले पाहिजे. भारत सरकार किंवा केंद्र सरकार समकक्ष पात्रता. उमेदवाराचे शैक्षणिक पात्रतेदरम्यान शिक्षण सुरूच असल्यास उमेदवारी गृहीत धरली जाणार नाही. पदवी पूर्ण असल्याचे प्रमाणपत्र दाखल करावा लागेल. ऑनलाइन अर्ज करताना प्रमाणपत्राच्या गुणांची टक्केवारी दर्शविणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 वर्ष ते 30 वर्ष या दरम्यान असले पाहिजे. तो SC/ST या प्रवर्गातील असेल तर त्याला 5 वर्षांची सूट दिली जाईल आणि OPEN/OBC या प्रवर्गातील असल्यास 3 वर्षांची सूट दिली जाईल.
Indian Bank vacancy 2024 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया :
1)सर्वात आधी बँकेच्या अधिकृत पीडीएफ (PDF) ला किंवा अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
2) नंतर vacancy of local bank officer 2024 registration यावर क्लिक करा. अर्ज नोंदणीसाठी new registration टॅब निवडून स्वतःचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी हे संपूर्ण तेथे भरून घ्या. एक तोपर्यंत नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड प्रणाली द्वारे तयार केला जाईल. तात्पुरता नोंदणी क्रमांक नोंदवल्यानंतर आपला पासवर्ड सुरक्षित ठेवावा. नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड आपल्याला मेसेज द्वारे किंवा ई-मेल द्वारे पाठवला जातो.
3) ऑनलाइन अर्ज करताना जर तुम्ही पहिल्या वेळेस अर्ज करू शकला नाही,तरsave and next हे टॅब घेऊन पूर्वीची सगळी माहिती जतन करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याआधी, उमेदवाराला ऑनलाईन अर्जातील सर्व भरलेली माहिती तपासण्यासाठी save and next सुविधा वापरण्याचा व गरज भासल्यास त्यामध्ये काही बदलण्याचा सल्ला देण्यात येतो.
4) ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराला स्वतःची संपूर्ण माहिती आणि आपल्या शिक्षण पात्रतेची संपूर्ण माहिती योग्य त्या ठिकाणी सुयोग्य पद्धतीने प्रविष्ट करायची आहे, कारण शेवटी अर्ज सबमिट करताना सबमिट नावाच्या बटनावर एकदा क्लिक केल्यास पुन्हा काहीच करता येत नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
5) त्यानंतर आपली संपूर्ण माहिती योग्य असल्यास validate your details and save and next या बटनाला क्लिक करून तुमचा अर्ज पूर्ण करा.
6)आपला पासपोर्ट फोटो, आणि स्वतःची सही अपलोड करण्यासाठी काही नियमांचे व सूचनांचे पालन करायला लागेल.
7) तुमचा पासपोर्ट फोटो, आणि सही अपलोड करून झाल्यास अर्जातील काही माहिती भरण्याकरिता पुढे जाणे गरजेचे असते.
8) गरज भासल्यास तपशिलात सुधारणा करा व अपलोड केलेले पासपोर्ट फोटो, सही सगळी महत्त्वाच्या सविस्तर माहितीची तपासणी केल्याशिवाय registration complete हे बटन दाबू नका.
9) ऑनलाइन अर्जाची फी भरण्यासाठी payment नावाच्या टॅब वर दाबा आणि फी भरून घ्या.
10) अर्जाची फी भरून आपल्या अर्जाची प्रिंट आऊट डाउनलोड करा आणि जपून ठेवा.
11) इंडियन बँक भरती 2024 दरम्यान अर्ज करण्यासाठी वैयक्तिक आवश्यक कागदपत्रे जोडा, कागदपत्रे चुकीची किंवा बनावटीची असल्यास आपण ती सादर करू नये, अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते. याची दखल घ्यावी.
Indian Bank vecancy 2024 Important Links :
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
प्रिय मित्रांनो,‘ इंडियन बँकेत भरती ’ साठी ऑनलाईन अर्ज करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज करताना इंडियन बँके अंतर्गत जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा इंडियन बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!