SATARA DCC BANK BHARTI 2024| सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 323 जागांसाठी रिक्त भरती !

ही माहिती इतरांना शेअर करा.

SATARA DCC BANK BHARTI 2024:मित्रांनो, जर तुम्ही दहावी पास असाल आणि बँकेत नोकरी करू इच्छिता तर तुमच्यासाठी हा लेख खूप महत्त्वाचा आहे. कारण सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घेऊन येत आहे तब्बल 323 जागांची मेगा भरती. कनिष्ठ लेखक आणि कनिष्ठ शिपाई यांचीही रिक्त भरती असणार आहे. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका.

SATARA DCC BANK BHARTI 2024
SATARA DCC BANK BHARTI 2024

SATARA DCC BANK BHARTI 2024:( सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ) या बँकेमार्फत उमेदवारांना दोन पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. बँकेने कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई पदांसाठी ऑनलाइन परीक्षा आणि थेट नोकरी असे जाहीर केले आहे, जो उमेदवार भरतीसाठी पात्र असेल अशा उमेदवाराचे अर्ज मागविण्यात येत आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 323 रिक्त जागा असणार आहेत. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. 21 ऑगस्ट 2024 ही ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख असेल. उमेदवारांनी या भरतीचा पुरेपूर लाभ घ्यावा.

मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सदरील भरतीस अर्ज करण्याची स्वइच्छा बाळगता, तर आम्ही आपणास या लेखात संपूर्ण महत्त्वाची माहिती सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत, या मोहिमेत आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदांची संपूर्ण माहिती, परीक्षेची माहिती, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख, नोकरीचे ठिकाण अशा विविध विषयांचा आढावा आपण तपशीलवारपणे जाणून घेऊयात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदरील भरतीची घोषणा तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रीणींसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच विविध भरतीच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन करा.

Satara DCC Bank Bharti 2024 उमेदवारांची शैक्षणिक पात्रता:

1) कनिष्ठ लिपिक :
कोणत्याही शाखेचा पदवीधर( शासनमान्य विद्यापीठ ), संगणक चालवणे अवगत, तत्सम परीक्षा पास त्याचप्रमाणे वाणिज्य शाखेचा पदवी पूर्ण / पदव्युत्तर पदवीधर व बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ श्रेणीतील कामकाजांचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य. तसेच इंग्रजी/ मराठी टंकलेखन, लघु लेखनाची परीक्षा पास असल्यास प्राधान्य.

2) कनिष्ठ शिपाई :
मॅट्रिक पास / किमान इयत्ता 10 वी, उत्तीर्ण इंग्लिश भाषेचे ज्ञान व संगणक चालवणे अवघत असणे गरजेचे आहे.

Satara DCC Bank Bharti 2024 नोकरी बाबत सविस्तर / संपूर्ण माहिती :

1) पदाचे नाव- कनिष्ठ लिपिक (Junior Clerk), कनिष्ठ शिपाई (Junior Peon) सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत या दोन पदांसाठी रिक्त भरती केली जाणार आहे.

2) पद संख्या – ही मेगा भरती 323 जागांकरिता जाहीर करण्यात आली आहे.

3) शैक्षणिक पात्रता– सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मधील दोन्ही पदांकरिता शैक्षणिक पात्रता 10वी पास ते पदवीधर अशी आहे. सविस्तर माहितीसाठी जाहिरातीच्या पीडीएफ (PDF) ला भेट द्या.

4) नोकरीचे ठिकाण – ही भरती सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत केली जात असून, त्याचे नोकरी ठिकाण साताराच असणार आहे.

5) वयाची मर्यादा – या भरती करिता उमेदवार हा 38 वर्ष वयोगटाच्या खालचा असला पाहिजे. (SC/ST 5 वर्ष सूट आणि OBC 3 वर्ष सूट )

6) अर्जाची पद्धत – या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

7) ऑनलाइन अर्जाची फी – 500 रुपये + 18% जीएसटी GST एकूण 590 रुपये फी राहील.

8) अर्जाची अंतिम तारीख– 21 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतो त्यानंतर अर्ज केल्यास तो गृहीत धरला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

9) विभाग – सदर भरतीचा विभाग सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विभाग असणार आहे.

10) भरती श्रेणी – सदरील भरती राज्य श्रेणी अंतर्गत असणार आहे.

Satara DCC Bank Bharti 2024 पदांची संख्या:

पदाचे नावपदांची संख्या
कनिष्ठ लिपिक 263
कनिष्ठ शिपाई 60
Satara DCC Bank Bharti 2024 अर्जाच्या महत्त्वाच्या तारखा:
वेबसाईटवर परीक्षा फीसह ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख12 ऑगस्ट 2024 ते 21 ऑगस्ट 2024 पर्यंत
ऑनलाइन परीक्षा वेळापत्रक डाऊनलोड करण्याची तारीखबँकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात येईल
ऑनलाइन परीक्षेची तारीख बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात येईल
कागदपत्रांची तपासणी व मुलाखतीची तारीखबँकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात येईल
Satara DCC Bank Bharti 2024 मासिक पगार किती?
पदाचे नावपगार
कनिष्ठ लिपिकरु .21855/-
कनिष्ठ शिपाईरु .19090/-

Satara DCC Bank Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया:

  • सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची बँक अंतर्गत संकेतस्थळाला भेट द्या.
  • उमेदवारांना सर्वप्रथम संकेतस्थळावर नोंद करणे new registration या बटनाला क्लिक करून स्वतःची संपूर्ण हवी ती माहिती योग्य त्या ठिकाणी प्रविष्ट करून वैयक्तिक लोगिन आयडी व पासवर्ड बनवा.
  • लॉगिन करून त्यात स्वतःची माहिती / शैक्षणिक पात्रता/ आपल्याला कामा संबंधित असलेला अनुभव हे सगळे तेथे प्रविष्ट करा.
  • उमेदवाराचा पासपोर्ट साईज फोटो, उमेदवाराची स्वाक्षरी,आधार कार्ड व गरजेचे इतर कागदपत्रे.
  • अर्ज भरल्यास ऑनलाईन अर्जाची फी भरा व फी भरल्याची पावती घ्या.
  • अर्ज प्रविष्ट करून तपासल्यास अर्जाची प्रिंट आऊट डाऊनलोड करा व जपून ठेवा.

Satara DCC Bank Bharti 2024 उमेदवारांची निवड अशा प्रकारे होईल :

1) कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांची परीक्षा संगणकामार्फत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे स्वरूप हे बहुपर्यायी (MCQ)असेल. 90 मिनिटात, 90 मार्कासाठी,90 प्रश्न विचारले जातील प्रत्येकी 1 मार्क दिला जाईल. या चाचणीत गणित, मराठी, इंग्रजी, बँकिंग व सहकार, जनरल नॉलेज, कृषी व ग्रामस्थ व्यवस्था, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमत्ता या विषयांच्या आधारे प्रश्न विचारले जातील.

2) कागदपत्र तपासणी आणि मुलाखतीसाठी ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना बोलावले जाईल.

SATARA DCC BANK BHARTI 2024 Important Links :

📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात
येथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्ज
येथे क्लिक करा
💻 सविस्तर माहिती
येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट
येथे क्लिक करा

प्रिय मित्रांनो, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाता नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now