Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024|मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024!

ही माहिती इतरांना शेअर करा.

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 : मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, कारण सरकारने मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 चा नवीन PDF प्रदर्शित केला आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेला “ मुख्यमंत्री योजना दूत” असे नाव देऊन जाहीर केले आहे. या योजनेअंतर्गत राज्यातल्या तरुणांसाठी एक चांगलीच सुवर्णसंधी चालून आली आहे. ही सुमारे 50 हजार पदांची मेगा भरती असणार आहे.

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 : महाराष्ट्र सरकारच्या नाविन्यता, रोजगार, उद्योजकता, कौशल्य आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यातर्फे संयुक्तपणाने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू करण्याचा एक मोठा आणि चांगला निर्णय शासना द्वारे घेण्यात आलेला आहे.या निर्णयास 9 जुलै 2024 रोजी मान्यता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या अनेक योजनांना प्रसारित करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ होण्यासाठी 50 हजार दूत नेमण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची माहिती तसेच जनतेशी संपर्क याची सगळी जिम्मेदारी महासंचालनालयाकडे देण्यात आली आहे.

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 अर्ज करण्याची सुरुवात :

सरकारने या निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजनादूतांचे मानधन, रोजगार,कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे व योजना दुतांच्या निवडीने निकष, अटी व शहर तयार करण्याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात येणार आहे.मित्रांनो, आपणास किंवा आपल्या कुटुंबातील इतरांना मुख्यमंत्री योजना दूत भरतीचा अर्ज भरायचा असेल,तर त्याची संपूर्ण माहिती,पात्रता, व लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे या सर्व गोष्टींची माहिती या लेखात आपण दिलेली आहे, त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या..! मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 अर्ज करण्याची सुरुवात:

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 अर्ज करण्याची सुरुवात :

मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 ची अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल,सरकारने एवढ्यात अर्जाची तारीख जाहीर केलेली नाही. तारीख जाहीर झाल्यानंतर आपल्याला कळविण्यात येईल.

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 योजनेचे वैशिष्ट्ये :

  • मुख्यमंत्री योजना दूत भरतीद्वारे ग्रामीण भागातील सर्वच ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5 हजार लोकसंख्येकरिता एक योजनादूत या प्रकारे एकूण 50 हजार योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे.
  • मुख्यमंत्री योजना दूत भरतीमध्ये निवडलेल्या दुतास दहा हजार रुपये एवढा ठोक मासिक पगार मिळत आहे.
  • मुख्यमंत्री योजना दूत भरतीमध्ये पात्र होणारे योजना दूत हे सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निवडले जाणार आहेत.
  • महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची प्रचार, प्रसिद्धी करणे व त्याचा भरपूर लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविणे याच्यासाठी मुख्यमंत्री योजना दूध डायरेक्ट ग्राम स्तरापर्यंत नेमणे.
भरतीचे नाव“ मुख्यमंत्री योजना दूत ”(Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024)
कोणी सुरू केली महाराष्ट्र शासन
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील युवा वर्ग
मिळणारा लाभ50 हजार युवांना नोकरी
श्रेणीही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे
अर्ज करण्याची पद्धतया योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज भरता येतो

जर आपणास या भरती मध्ये अर्ज करायचा असेल, तर तुमची पात्रता खालील प्रमाणे असणे आवश्यक आहे किंवा गरजेचे आहे.

1) अर्जकर्ता उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवी पूर्ण असणे गरजेचे आहे.
2) अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष या दरम्यान असले पाहिजे हे आवश्यक आहे.
3) अर्जकर्ता उमेदवाराकडे मोबाईल असणे हे सुद्धा गरजेचे आहे.
4) अर्ज कर्ता उमेदवार हा संगणक चालविण्याचा जाणकार असला पाहिजे.
5) अर्ज करता उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
6) अर्ज कर्ता उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या बँक खात्याशी आधार संलग्न असावे.

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 साठी आवश्यक कागदपत्रे :

  • उमेदवाराचे आधार कार्ड
  • पदवी पास कागदपत्रे / प्रमाणपत्र इ.
  • विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाइन अर्ज
  • स्वतःचा मोबाईल नंबर
  • वैयक्तिक ई-मेल आयडी
  • रहिवाशी दाखला / प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • वैयक्तिक बँक खाते पासबुक
  • हमीपत्र ( ऑनलाइन अर्ज सोबतच्या नमुन्या मधील )

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 अर्ज प्रक्रिया :

या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असल्यास उमेदवाराला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मध्ये स्वतःचे नाव नोंदवणे गरजेचे आहे.

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 नेमणूक प्रक्रिया :

1) प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करण्यासाठी जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त केलेले बाह्य संस्था याची छाननी पूर्ण करेल.

2) ऑनलाइन अर्जाची तपासणी केल्यानंतर निवडून उमेदवाराची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या माहिती अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येईल.

3) उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी ही जिल्हाधिकारी यांनी निवड केलेल्या प्रतिनिधी मार्फत केली जाईल.

4) उमेदवारांची निवड यादी जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याने योजलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने त्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येकी एक आणि शहरी भागात 5 हजार लोकसंख्येलगत एक याप्रमाणे योजना दूत पाठवला जाईल.

5) मुख्यमंत्री योजनेतून या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी किंवा हक्क सांगितला जाणार नाही. याचे हमीपत्र निवड झाले आहे.

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 निवडक उमेदवारांची कामे :

निवडक उमेदवारांना संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या सानिध्यात राहून जिल्ह्यातील योजनेची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. प्रशिक्षित योजना दुतायांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी स्वतः जाऊन ठराविक काम पार पाडणे बंधनकारक आहे. योजना दूतांनी महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा प्रसार आणि प्रसिद्धी करत्या वेळी ग्रामीण पातळीवरील यंत्रणाची समन्वय करून सरकारच्या योजनांची प्रत्येक घरी माहिती होईल याकरिता प्रयत्न करणे, योजना मार्फत प्रत्येक दिवसभरातील सगळ्या कामाचा तपशील करून तो ऑनलाइन अपलोड करणे.

योजना दूतांना सोपविण्यात आलेल्या जबाबदारीचे स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा नियमा बाहेरील कामासाठी उपयोग करता येणार नाही, गैर वर्तणूक चालणार नाही, गुन्हेगारी स्वरूप निदर्शनास आल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल व कामावरून निलंबित केले जाईल.

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 निवडक उमेदवारांचे मासिक वेतन :

वेतन-10 हजार रुपये प्रति महिना प्रवास भत्ता आणि इतर सर्व भत्त्यांसहित म्हणजे याच दहा हजार रुपयांमध्ये तुमच्या प्रवासाचा खर्च व इतर संपूर्ण खर्च देखील असेल. तसेच निवडक उमेदवारांचा सहा महिन्यासाठी चा करार करण्यात येईल, अटी शर्ती प्रमाणे सहा महिने काम सोडता येणार नाही, या करारामध्ये कोणत्याही परिस्थितीत वाढ करण्यात येणार नाही, तसेच निवड झालेल्या उमेदवारांना कुठल्याही सरकारी सुविधांचा लाभ देखील घेता येणार नाही. याची सर्व अर्जदारांनी नोंद घेणे गरजेचे आहे.

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 Important Links :

📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात
येथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्ज
येथे क्लिक करा
💻 सविस्तर माहिती
येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट
येथे क्लिक करा

प्रिय मित्रांनो, मुख्यमंत्री योजना दूध भरती 2024 साठी अर्ज सादर करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, वरील लेखाद्वारे दिलेली माहिती अपूर्ण असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अर्ज सादर करताना मुख्यमंत्री योजना दूध भरती 2024 द्वारे जाहीर केलेला पीडीएफ (PDF) किंवा अंतर्गत संकेतस्थळाता नक्की भेट द्या ही नम्र विनंती..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now